महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani teaser: रणवीर आणि आलिया भट्टची डोळे दिपवून टाकणारी प्रेम कहानी - Ranveer Singh

आलिया भट्ट आणि रणवीर सिंग स्टारर रॉकी और रानी की प्रेम कहानीचा बहुप्रतिक्षित टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून करण जोहर दिग्दर्शनात पुनरागमन करत असून त्याची या फिल्म इंडस्ट्रीत २५ वर्षे पूर्ण होत आहेत.

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani teaser
रॉकी और रानी की प्रेम कहानीचा बहुप्रतिक्षित टीझर

By

Published : Jun 20, 2023, 12:30 PM IST

मुंबई- आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांची प्रमुख भूमिका असलेला रॉकी और रानी की प्रेम कहानी हा आगामी चित्रपट या वर्षातील सर्वाधिक बहुप्रतीक्षित बॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे. करण जोहर 7 वर्षांच्या विश्रांतीनंतर दिग्दर्शनात पुनरागमन करणार आहे. चित्रपटाचे निर्माते गेल्या काही काळापासून प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत होती आणि आता ती प्रतीक्षा संपली आहे.

भव्या दृष्ये असलेला टीझर मात्र कथानक गुदस्त्यात - रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाचा 1 मिनिट आणि 16 सेकंदांचा टीझर, करण जोहरची क्षमता प्रदर्शित करतो. प्रेक्षकांना आकर्षक आणि आकर्षक सिनेमॅटिक अनुभव सादर करण्यासाठी भव्य स्केल आणि बजेटच्या बाबतीत कोणतीही कसूर केली नसल्याचे दिसत आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानीच्या टीझरमध्ये कोणताही संवाद नाही. त्याऐवजी, तुम क्या मिले हे गाणे पार्श्वभूमीत ऐकू येत राहते. प्रिव्ह्यूमध्ये रॉकी आणि राणी एकमेकांच्या प्रेमात पडत असल्याचे दाखवले आहे. मात्र, चित्रपटाचे कथानक गुलदस्त्यात ठेवलेले आहे.

करण जोहरचे टीझरमधून प्रेक्षकांना आमंत्रण - चित्रपटाच्या टीझरमध्ये एक ओळ येऊन जाते ती म्हणजे, 'करण जोहर तुम्हाला वर्षातील सर्वात मोठे मनोरंजन अनुभवण्यासाठी आमंत्रित करतो आहे'. भव्य सेट्स, नेत्रदिपक लाईट्स, आकर्षक कोरिओग्राफी, नजरेचे पारणे फेडणाऱ्या अनेक कलात्मक गोष्टी चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणारी आहे. आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांची जबरदस्त ऑन स्क्रिन केमेस्ट्री यात पाहायला मिळत आहे.

दिग्गज कलाकारांची मांदियाळी- जया बच्चन यात आक्रमक रुपात दिसत आहेत, तर शबाना आझमी आणि धर्मेंद्र संयमी दाखवले आहेत. सिंग जेव्हा टीझरच्या शेवटी तुम क्या मिले गाणे सुरू करतो, तेव्हा त्याचा प्रभाव आणखी वाढतो. या चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी अशी दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details