मुंबई : या वर्षातील सर्वात मोठ्या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून रणवीर सिंग आलिया भट्टच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच झेप घेतली. मात्र आता सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफसवर स्थिर कमाई करत असल्याचे चित्र दिसत आहे. पहिल्या आठवड्या या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई करेल अशी अपेक्षा केली होती. आता करण जोहरच्या या चित्रपटने या आठवड्यात बरी कमाई केली आहे.
चित्रपटाने केली नऊ दिवसात कमाई : आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्या चित्रपटाने अवघ्या नऊ दिवसांत ९० कोटींचा टप्पा पार केला आहे. १०व्या दिवशी हा चित्रपट १०० कोटींचा क्लबमध्ये जाईल अशी आशा या चित्रपटाचे निर्माते करत आहे. २८ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी ११.१० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. सुरुवातीच्या अंदाजानुसार, चित्रपटाने रिलीजच्या ९व्या दिवशी ५ ऑगस्ट रोजी ११.५० कोटी रुपयांची कमाई केली, त्यानंतर भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचे एकूण कलेक्शन ९१.५८ कोटी रुपये झाले. दरम्यान, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' ने दुसऱ्या शनिवारी एकूण ३६.५९ टक्के व्याप्ती पाहिली.
लवकरच होणार १०० कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश : दुसऱ्या वीकेंडच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने ६.७५ कोटींची कमाई केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हळूहळू कमाई करत आहे. रिलीजच्या १०व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करेल असा अंदाज बांधला जात आहे. या चित्रपटाचे खूप प्रमोशन केल्यानंतर करण जोहरला हा रिजल्ट पाहायला मिळत आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग व्यतिरिक्त दमदार स्टार कास्ट असल्याने या चित्रपटाला बघण्यासाठी अनेक प्रेक्षक जात आहे. हा चित्रपट देशात नाही तर जगभरात देखील चांगलीच कमाई करत आहे.