महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Rocky Aur Rani Ki Prem Kahaani : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाच्या पडद्याआडचे काही खास सीन्स... - करण जोहर

करण जोहरने त्याच्या आगामी चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या सेटवरील एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रणवीर सिंग, आलिया भट्ट आणि करण जोहरसह संपूर्ण टीम मस्ती करताना दिसत आहे.

Rocky Aur Rani Ki Prem Kahaani
रॉकी और रानी की प्रेम कहानी

By

Published : Jul 8, 2023, 6:54 PM IST

मुंबई : करण जोहर हा आगामी ''रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला फार दिवस उरलेले नाही आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाचे दिवस हे हातावर मोजण्यासारखे आहेत. याची वाट प्रेक्षक फार आतुरतेने पाहत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही काही खास सीन्स या चित्रपटात तुम्हाला बघायला मिळणार नाही जे आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत. हे सीन्स पडद्याआडमधील आहेत. त्यामुळे या सीन्समध्ये पडद्याआड मस्ती करताना तुम्हाला रणबीर आणि करण दिसणार आहे.

काही खास सीन्स :दरम्यान, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी, करण जोहर त्याच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी एकामागून एक बीटीएस व्हिडिओ आणि फोटो शेअर करत आहे. अलीकडे, रणवीर सिंगच्या ३६ व्या वाढदिवसानिमित्त, करण जोहरने रणबीरसोबत रॉकी और रानी की प्रेम कहानीच्या सेटवरील बीटीएस (BTS) फोटो शेअर केली. आता करणने पुन्हा एकदा एक व्हिडिओ शेअर केला आहे. करणने शेअर केलेला व्हिडिओ 'तुम क्या मिले' या गाण्याच्या सेटवरील असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊस धर्मा प्रोडक्शनवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये करण जोहर, आलिया भट्ट, रणवीर सिंग आणि 'तुम क्या मिले' गाण्याची कोरिओग्राफर वैभवी मर्चंटसोबत दिसत आहेत.

'रॉकी रानी की प्रेम कहानी' रूपेरी पडद्यावर या दिवशी प्रदर्शित :या व्हिडिओमध्ये, चित्रपटातील रिलीज झालेल्या तुम क्या मिले या रोमँटिक गाण्याची बहुतांश दृश्ये दिसत आहेत. तसेच या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पांढरी साडी परिधान केलेली आलिया भट्ट काश्मीरच्या पांढऱ्या बर्फाच्या मैदानात शूटिंगदरम्यान पडण्यापासून बचावली आहे. 'तुम क्या मिले' या गाण्याचे शूटिंग काश्मीरमध्ये झाले आहे. त्याचबरोबर करण जोहर आणि रणवीर सिंगची मस्ती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. रणवीर सिंग, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन स्टारर हा आगमी चित्रपट 28 जुलै रोजी जगभरात रिलीज होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details