महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Ved crosses Rs 50 crore : वेडने पार केला ५० कोटी कमाईचा टप्पा, रितेशने भावूक होऊन मानले आभार - रितेश देशमुख

रितेश आणि जेनेलियाच्या वेड या चित्रपटाने १८ जानेवारीपर्यंत तब्बल ५० कोटींची कमाई केली आहे. वेड चित्रपटाला मिळणाऱ्या प्रेमाबद्दल रितेश देशमुख आणि जिनिलीयाने प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले आहेत.

वेडने पार केला ५० कोटी कमाईचा टप्पा
वेडने पार केला ५० कोटी कमाईचा टप्पा

By

Published : Jan 19, 2023, 2:16 PM IST

मुंबई- गेल्या दोन आठवड्यापासून रितेश देशमुख आणि जिनिलीयाचा ‘वेड’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम रचत आहे. या चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर अजूनही कायम आहे. या चित्रपटाने १८ जानेवारीपर्यंत तब्बल ५० कोटींची कमाई केली आहे. वेड चित्रपटाला मिळणाऱ्या प्रेमाबद्दल रितेश देशमुख आणि जिनिलीयाने प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले आहेत.

रितेश देशमुखने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्याने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. त्याने लिहिलंय, शब्द अपुरे पडत आहेत!!! वेड चित्रपटाला मोठ्या मनाने आपण स्वीकारले आणि भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुम्हा प्रेक्षकांचे कोटी कोटी आभार!

वेड चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २०.१८ कोटी रुपयांची कमाई केली आणि दुसऱ्या आठवड्यात २०.६७ कोटी रुपयांची कमाई केली असल्याचे रितेशने लिहिलंय. अशा प्रकारे आतापर्यत चित्रपटाचा एकूण कमाई ५० कोटीवर पोहोचली आहे.

रितेश देशमुखचा वेड हा मराठी चित्रपट एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने ‘सैराट’च्या नावे असलेला विक्रम मोडला आहे. तर रितेश देशमुखचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट हा ‘लय भारी’चा रेकॉर्डही ‘वेड’ने मोडला. आता या चित्रपटाने सर्वात जास्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे.

वेड हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये मोठे रेकॉर्ड बनवत आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 10 कोटींचा व्यवसाय केला, ज्यामुळे व्यापार तज्ञांना आनंद झाला. पहिल्या आठवड्याची कमाई पाहून ट्रेड पंडितांना वाटले की दुसऱ्या वीकेंडलाही त्याची कमाई चांगली होईल, मात्र दुसऱ्या वीकेंडमध्ये वेडने असे आकडे नोंदवले आहेत की सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

ट्रे

ड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी याआधीच वेड चित्रपटाने दुसऱ्या वीकेंडमध्ये नोंदवलेले आकडे शेअर केले आहेत, त्यानुसार गेल्या तीन दिवसांत पहिल्या आठवड्यापेक्षा जास्त कमाई केली आहे. तरण आदर्शने सांगितले की, वेडने दुसऱ्या वीकेंडमध्ये 12 कोटींचा टप्पा पार करून एक विक्रम केला आहे. वेड चित्रपटाच्या दुसऱ्या वीकेंडची कमाई २.३५ कोटी होता व एकूण कमाई ३५. ७७ कोटी होती.रितेश देशमुखच्या वेडने 10 व्या दिवशी इतिहास रचला - रविवार दि. ८ जानेवारी दिवशी वेड चित्रपटाच्या रिलीजला १० दिवस पूर्ण झाले होते. या दिवशीची बॉक्स ऑफिस कमाई ५.७० कोटी होती. ही आजवरची मराठी चित्रपटाची १० दिवसाची सर्वाधिक कमाई आहे. यापूर्वी सैराट या चित्रपटाने १० व्या दिवशी ४.६१ कोटींची कमाई केली होती. सैराटचा हा विक्रम रितेशच्या वेडने पहिल्यांदाच मोडला आहे. रितेश देशमुखचा वेड हा पहिला चित्रपट आहे, ज्याने 10 व्या दिवसाच्या कलेक्शनसह सर्व हिट मराठी चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांना मागे टाकले आहे. वेडची ११ व्या दिवसाची कमाई पाहता लवकरच हा सिनेमा ५० कोटींचा आकडा पार करेल असा अंदाज ट्रेड तज्ज्ञ व्यक्त केला होता. आता या आकड्याच्या जवळ कमाई पोहोचली आहे.

विशेष म्हणजे अभिनेता सलमान खान त्याच्या दिग्दर्शनाच्या पहिल्या प्रोजेक्टमध्ये पाहुण्यांच्या भूमिकेत झळकला आहे. 'वेड' चित्रपटातून जेनेलिया डिसूझाही मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. रितेश आणि जेनेलियाच्या जोडीला प्रेक्षक प्रचंड प्रतिसाद देत आहेत.

दरम्यान, रितेश नुकताच तमन्ना भाटियासोबत 'प्लॅन ए प्लान बी' या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात दिसला होता. शशांक घोष दिग्दर्शित, या चित्रपटाचा प्रीमियर केवळ नेटफ्लिक्सवर झाला आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तो सोनाक्षी सिन्हा आणि साकिब सलीम सोबत आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट 'काकुडा' मध्ये देखील दिसणार आहे.त्याच्याकडे जेनेलिया डिसूझासोबत 'मिस्टर ममी' हा विनोदी चित्रपट आणि जॉन अब्राहम, नोरा फतेही आणि शहनाज गिल यांच्यासोबत '100%' हा चित्रपटही आहे

हेही वाचा -Gandhar Group In Film Industry : गंधार ग्रुपची फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री, भव्य चित्रपट आणि वेब सिरीजची करणार निर्मिती

ABOUT THE AUTHOR

...view details