मुंबई- बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुखचा नुकताच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट वेडने सिनेमागृहांमध्ये जोरदार कमाईचा आकडा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू ठठेवली आहे. ११ व्या दिवसांनंतरही चित्रपट थांबण्याचे नाव घेत नाही. वेड हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये सातत्याने प्रचंड कमाई करत आहे आणि मोठे रेकॉर्ड बनवत आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 10 कोटींचा व्यवसाय केला, ज्यामुळे व्यापार तज्ञांना आनंद झाला. पहिल्या आठवड्याची कमाई पाहून ट्रेड पंडितांना वाटले की दुसऱ्या वीकेंडलाही त्याची कमाई चांगली होईल, मात्र दुसऱ्या वीकेंडमध्ये वेडने असे आकडे नोंदवले आहेत की सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी याआधीच वेड चित्रपटाने दुसऱ्या वीकेंडमध्ये नोंदवलेले आकडे शेअर केले आहेत, त्यानुसार गेल्या तीन दिवसांत पहिल्या आठवड्यापेक्षा जास्त कमाई केली आहे. तरण आदर्शने सांगितले की, वेडने दुसऱ्या वीकेंडमध्ये 12 कोटींचा टप्पा पार करून एक विक्रम केला आहे. वेड चित्रपटाच्या दुसऱ्या वीकेंडचे काही आकडे येथे आहेत:
शुक्रवार: रु. 2.52 कोटी
शनिवार: ४.५३ कोटी रु
रविवार: रु. 5.70 कोटी
सोमवार: रु. २.३५ कोटी
एकूण कमाई - ३५.७७ कोटी.
रितेश देशमुखच्या वेडने 10 व्या दिवशी इतिहास रचला - रविवार दि. ८ जानेवारी दिवशी वेड चित्रपटाच्या रिलीजला १० दिवस पूर्ण झाले होते. या दिवशीची बॉक्स ऑफिस कमाई ५.७० कोटी होती. ही आजवरची मराठी चित्रपटाची १० दिवसाची सर्वाधिक कमाई आहे. यापूर्वी सैराट या चित्रपटाने १० व्या दिवशी ४.६१ कोटींची कमाई केली होती. सैराटचा हा विक्रम रितेशच्या वेडने पहिल्यांदाच मोडला आहे. रितेश देशमुखचा वेड हा पहिला चित्रपट आहे, ज्याने 10 व्या दिवसाच्या कलेक्शनसह सर्व हिट मराठी चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांना मागे टाकले आहे. वेडची ११ व्या दिवसाची कमाई पाहता लवकरच हा सिनेमा ५० कोटींचा आकडा पार करेल असा अंदाज ट्रेड तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
विशेष म्हणजे अभिनेता सलमान खान त्याच्या दिग्दर्शनाच्या पहिल्या प्रोजेक्टमध्ये पाहुण्यांच्या भूमिकेत झळकला आहे. 'वेड' चित्रपटातून जेनेलिया डिसूझाही मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. रितेश आणि जेनेलियाच्या जोडीला प्रेक्षक प्रचंड प्रतिसाद देत आहेत.
दरम्यान, रितेश नुकताच तमन्ना भाटियासोबत 'प्लॅन ए प्लान बी' या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात दिसला होता. शशांक घोष दिग्दर्शित, या चित्रपटाचा प्रीमियर केवळ नेटफ्लिक्सवर झाला आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तो सोनाक्षी सिन्हा आणि साकिब सलीम सोबत आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट 'काकुडा' मध्ये देखील दिसणार आहे.
त्याच्याकडे जेनेलिया डिसूझासोबत 'मिस्टर ममी' हा विनोदी चित्रपट आणि जॉन अब्राहम, नोरा फतेही आणि शहनाज गिल यांच्यासोबत '100%' हा चित्रपटही आहे.