महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

रितेश देशमुखने केली जिनेलियाच्या अतुलनीय बार्गेनिंग कौशल्याची प्रशंसा - पत्नीचा खूप अभिमान आहे

रितेश देशमुखने त्याची पत्नी, अभिनेत्री जिनेलिया डिसूझाच्या बार्गेनिंग कौशल्याबद्दलचा किस्सा सांगितला. जिनेलियामुळे त्याने न्यूयॉर्कमध्ये जास्त किमतीचे शिल्प त्याच्या निम्म्या किमतीत खरेदी केले होते. वेड चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्याने हा किस्सा सांगितला.

जिनेलियाच्या अतुलनीय बार्गेनिंग कौशल्याची प्रशंसा
जिनेलियाच्या अतुलनीय बार्गेनिंग कौशल्याची प्रशंसा

By

Published : Dec 24, 2022, 12:53 PM IST

मुंबई- रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख सध्या त्यांच्या आगामी वेड या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतले आहेत. यावेळी रितेशने पत्नीच्या काटकसरीचे किस्से सांगितले. त्याने पत्नी, जेनेलिया डिसूझाच्या बार्गेनिंग कौशल्याबद्दल स्पष्टपणे सांगितले. त्याला एक प्रसंग आठवतो, जिथे जेनेलियामुळे त्याने न्यूयॉर्कमध्ये जास्त किमतीचे शिल्प त्याच्या निम्म्या किमतीत खरेदी केले होते.

तो म्हणाला: "मला कलेची खूप आवड आहे. म्हणून एकदा आम्ही न्यूयॉर्कमध्ये होतो आणि मी जिनेलियासोबत एका आर्ट गॅलरीत गेलो होतो. मला एक शिल्प खूप आवडले होते पण ते खूप किमतीचे होते. त्यामुळे मी विचार केला की इथे जेनेलियाला तिचे किंमत कमी करण्यासाठीचे कौशल्या वापरु द्यावे. मला आश्चर्य वाटले की ते शिल्प तिने अर्ध्या किमतीत मिळवले. मला माझ्या पत्नीचा खूप अभिमान आहे."

रितेशने 2003 मध्ये 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने 'मस्ती', 'क्या कूल है हम', 'ब्लफमास्टर!', 'मालामाल वीकली', 'यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ग्रँड मस्ती', आणि रोमँटिक थ्रिलर 'एक व्हिलन' मध्ये सिरीयल किलरची भूमिका केल्याबद्दल खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

आता, तो 'वेड' या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहे आणि अभिनेता शुभंकर तावडे आणि अजय-अतुल या संगीत जोडीसह तो चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'द कपिल शर्मा शो' मध्ये हजर झाला होता. यावेळी त्याने कपिलसोबत बरीच धमाल मस्ती केली आणि जिनेलियासोबत फिल्मचे प्रमोशनही केले.

'द कपिल शर्मा शो' सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होतो.

हेही वाचा -बर्थडे स्पेशल: अष्टपैलू अनिल कपूरच्या टॉप 10 चित्रपटांवर टाका एक नजर

ABOUT THE AUTHOR

...view details