महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कंतारा चित्रपटासाठी रजनीकांतने कौतुक केल्यामुळे भारावला ऋषभ शेट्टी - Kantara Box Office

कंतारा या चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषभ शेट्टी याचे साऊथ सुपरस्टार रजनीकांतने कौतुक केले आहे. हा चित्रपट अंगावर शहारा आणणारा आहे, याची प्रचिती प्रेक्षकांना येत असताना रजनीकांतने केलेल्या कौतुकामुळे ऋषभ भारवून गेला आहे.

रजनीकांतने कौतुक केल्यामुळे भारावला ऋषभ शेट्टी
रजनीकांतने कौतुक केल्यामुळे भारावला ऋषभ शेट्टी

By

Published : Oct 27, 2022, 2:04 PM IST

हैदराबाद - सुपरस्टार रजनीकांत यांनी बुधवारी अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी याची नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'कंटारा' चित्रपटासाठी प्रशंसा केली आहे. रजनीकांत यांनी ट्विटरवर लिहिले की, ""अज्ञात हे ज्ञात पेक्षा जास्त आहे" ऋषभ शेट्टी तुम्हाला लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून शुभेच्छा देतो. भारतीय चित्रपटसृष्टीतील या उत्कृष्ट कलाकृतीच्या संपूर्ण कलाकारांचे आणि क्रूचे अभिनंदन."

ऋषभ शेट्टी दिग्दर्शित 'कंतारा' 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि त्याच्या कथानकासाठी आणि अप्रतिम व्हिज्युअलसाठी प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.

रजनीकांतच्या ट्विटला उत्तर देताना ऋषभ शेट्टीने लिहिले, "प्रिय रजनीकांत सर, तुम्ही भारतातील सर्वात मोठे सुपरस्टार आहात आणि मी लहानपणापासून तुमचा चाहता आहे. तुमची प्रशंसा हेच माझे स्वप्न सत्यात उतरले आहे. तुम्ही मला आणखी स्थानिक कथा करण्यासाठी प्रेरित करुन आमच्या प्रेक्षकांना प्रेरणा दिली. धन्यवाद सर."

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या मते, चित्रपटाने रिलीजच्या 2 आठवड्यांनंतर हिंदी मार्केटमध्ये २९ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

यापूर्वी बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतने देखील तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये तिने अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीच्या आश्चर्यकारक कामाबद्दल प्रशंसा केली होती. रिलीज होऊन जवळपास 1 महिना उलटूनही हा चित्रपट अजूनही भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे.

दरम्यान, रजनीकांतच्या फिल्म फ्रंटबद्दल बोलायचे तर, तो पुढे ऐश्वर्या राय बच्चन, रम्या कृष्णन, प्रियांका अरुल मोहन आणि शिवा राजकुमार यांच्यासोबत अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'जेलर' मध्ये दिसणार आहे. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित या प्रकल्पाचे शूटिंग आधीच सुरू झाले आहे. अधिकृत रिलीज तारखेची अद्याप प्रतीक्षा आहे.

'जेलर'पूर्वी, रजनीकांत आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी "रोबोट" चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते जे ब्लॉकबस्टर हिट ठरले होते. या चित्रपटात अॅश आणि रजनीची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री काही जादूईपेक्षा कमी नव्हती.

हेही वाचा -रितेशचे दिग्दर्शन पदार्पण आणि जेनेलियाच्या मराठी पदार्पणाच्या 'वेड' चित्रपटाचे पोस्टर लॉन्च

ABOUT THE AUTHOR

...view details