महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

ऋषभ शेट्टीने रजनीकांतचे चरण स्पर्श करुन घेतले आशीर्वाद - रजनीकांतच्या पाया पडला ऋषभ

'कंतारा' अभिनेता ऋषभ शेट्टीच्या कामावर खूश होऊन रजनीकांतने त्याची भेट घेतली. ऋषभ शेट्टीने रजनीकांत यांचे गुरु म्हणून आशीर्वाद घेतले.

ऋषभ शेट्टीने रजनीकांतचे चरण स्पर्श करुन घेतले आशीर्वाद
ऋषभ शेट्टीने रजनीकांतचे चरण स्पर्श करुन घेतले आशीर्वाद

By

Published : Oct 29, 2022, 11:31 AM IST

हैदराबाद- दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टी अभिनीत कन्नड चित्रपट 'कंतारा'ने चित्रपटसृष्टीला एक उत्तम आशय असलेला चित्रपट बहाल केला आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुँवाधार कमाई करत असून देशभर चित्रपटाचे फॅन्स तयार झाले आहेत. अलिकडेच रजनीकांत यांनी हा चित्रपट पाहून ऋषभ शेट्टीचे कौतुक केले होते. ऋषभ हा रजनीकांत यांचा फॅन आहे. त्यांना तो गुरुही मानतो. आपल्या गुरुने कौतुक केल्यामुळे ऋषभ भारावून गेला होता.

ऋषभ शेट्टीने घेतला रजनीकांत यांचा आशीर्वाद - ऋषभने रजनीकांत यांच्या घरी जाऊन त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले. यावेळी ऋषभ मोहरी रंगाचा स्वेट शर्ट आणि जीन्समध्ये होता. त्याचबरोबर रजनीकांतने पांढऱ्या धोतरावर काळा कुर्ता घातला आहे. या चित्रपटामुळे रजनीकांत किती खूश आहेत हे या चित्रावरून दिसून येते. रजनीकांत यांनी चित्रपटाचे कौतुक करत ऋषभ शेट्टीच्या कामाचे कौतुक केले.

चित्रपट पाहून रजनीकांतचे कौतुक - याआधी रजनीकांत यांनी चित्रपट पाहिल्यानंतर एक ट्विट केले होते. आदल्या दिवशी रजनीकांत यांनी कांतारा पाहिला आणि त्यानंतर लगेचच ट्विटरवर लिहिले, 'अज्ञात हे ज्ञातापेक्षा अनेक पटींनी मोठे आहे. हे हॉम्बली फिल्म्स पेक्षा चांगलं सिनेमात कुणीच सांगू शकत नाही. कांतारा, तू मला गूजबंप दिलेस. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून ऋषभ शेट्टीला सलाम.

हा भारतीय सिनेमाचा उत्कृष्ट नमुना आहे असे म्हणत रजनीकांत यांनी संपूर्ण कलाकार आणि क्रूचे अभिनंदन. त्यांनी ऋषभ शेट्टीच्या अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन कौशल्याचे कौतुक केले आणि सलाम केला. हा संदेश ऋषभ शेट्टीसाठी एक मोठी उपलब्धी आहे.

कमाईने 200 कोटींचा आकडा पार केला - कांतारा हा एक अॅक्शन आणि थ्रिलर चित्रपट आहे, जो 30 सप्टेंबर रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाने कमाईत त्याने केजीएफ आणि पोनिअन सेल्वनसारख्या चित्रपटांना मागे टाकले आहे. ऋषभ शेट्टीच्या कंतारा या चित्रपटाने 200 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.

हेही वाचा -फ्रेडीचे पहिले पोस्टर लॉन्च, कासवाच्या चालीने शर्यत जिंकण्यासाठी कार्तिक आर्यन सज्ज

ABOUT THE AUTHOR

...view details