महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Ridhi Dogra On Jawan : 'जवान'मध्ये शाहरुखच्या आईची भूमिका साकारत असलेल्या रिद्धी डोगरानं शेअर केला अनुभव... - ridhi dogra

Ridhi Dogra On Jawan: अभिनेत्री रिद्धी डोगरानं शाहरुखच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'जवान' चित्रपटात त्याच्या आईची भूमिका साकारली आहे. याबाबत तिनं तिचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

Ridhi Dogra On Jawan
रिद्धी डोगरा जवान

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 10:26 AM IST

मुंबई - Ridhi Dogra On Jawan: अ‍ॅटली दिग्दर्शित 'जवान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. या चित्रपटानं 2 दिवसात 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती स्टारर चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून कौतुक मिळत आहे. या चित्रपटात सर्व कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे. 'जवान'मध्ये रिद्धी डोगराचीही महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटात ती कावेरी अम्माची भूमिका साकारताना दिसली आहे. रिद्धीनं शनिवारी आपल्या इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ही भूमिका तिच्यासाठी सुवर्ण संधी असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय रिद्धीनं शाहरुख खानच्या कामाप्रती असलेल्या समर्पणाची प्रशंसा केली. 'जवान'च्या सेटवर कोणालाही फोन घेऊन जाण्याची परवानगी नसल्याचा खुलासाही तिनं केला.

'जवान'मध्ये काम करणं हे एका स्वप्ननासारखे : रिद्धी डोगरानं एक व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओमध्ये तिच्या 'जवान'मधील पात्राची कावेरीमध्ये झालेल्या परिवर्तनाची झलक दाखवली आहे. या पोस्टसोबत तिनं एक लांब कॅप्शन दिलं आहे, ज्यामध्ये तिनं लिहिलं, 'हा चित्रपट ब्लॉकबस्टर आहे!' 'जवान'च्या सेटवर असताना मी प्रत्येक वेळी हेच म्हणाची. सर्वजण सध्या या चित्रपटाला उत्सवासारखं साजर करत आहात. मला देखील या पोस्टसह सेलिब्रेट करायचं आहे. मला देकील या चित्रपटातील माझी भूमिका साजरी करायची आहे. माझ्या या भूमिकेला स्वीकारल्याबद्दल आभार. एक अभिनेत्री म्हणून मला वाटले, 'व्वा, हा अ‍ॅटलीचा चित्रपट आहे आणि मी एका आईची भूमिका साकारत आहे आणि तीही शाहरुखच्या आईची! मी वेडी आहे का?, मी हे करायचे ठरवले. तिनं पुढं म्हटलं, 'संपूर्ण क्रू आणि सर्व टीमनं इतकं परिश्रमपूर्वक आणि निःस्वार्थपणे काम केले आहे. हे आता खूप मेहनतीचे फळ आहे, तुमचा आनंद हाच आमचा आनंद आहे. धन्यवाद, ही आहे सिनेमाची जादू. असं तिनं पोस्टमध्ये 'जवान' चित्रपटाबाबत सांगितलं.

'जवान' स्टार कास्ट :या चित्रपटात शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती आणि रिद्धी डोगरा व्यतिरिक्त सान्या मल्होत्रा, प्रियामणी, सुनील ग्रोव्हर, एजाज खान, संजीता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, गिरिजा ओक आणि इतर अनेक कलाकार आहेत. जवानमध्ये दीपिका पदुकोण आणि संजय दत्त यांनी खास कॅमिओ केला आहे. रिद्धी डोगरानं 'राधा की बेटियां कुछ कर दिखेंगे', 'लागी तुझसे लगन', 'वो अपना सा' 'द मॅरीड वुमन' आणि 'असुर' यांसारख्या वेब सीरिजसह विविध टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. याशिवाय ती 'नच बलिए 6' आणि 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 6' सारख्या रिअ‍ॅलिटी टीव्ही शोचा भाग देखील होती.

हेही वाचा :

  1. Elvish Yadav Song : उर्वशी रौतेलासोबत 'हम तो दिवाने' म्यूझिक अल्बममध्ये झळकणार एल्विश यादव....
  2. Welcome to the Jungle teaser : अक्षय कुमारनं स्वतःला आणि चाहत्यांना दिली वाढदिवसानिमित्त खास भेट; 'वेलकम टू द जंगल'चा टीझर प्रदर्शित...
  3. Brahmastra part 2 dev : अयान मुखर्जी लवकरच घेऊन येणार 'ब्रह्मास्त्र पार्ट 2 - देव'; सोशल मीडियावर पोस्ट केली शेअर...

ABOUT THE AUTHOR

...view details