नवी दिल्ली - बॉलिवूड कलाकार रिचा चढ्ढा आणि अली फझल यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सची सुरुवात झाली आहे, हे स्टार जोडपे 4 ऑक्टोबर रोजी एका जिव्हाळ्याच्या विवाहसोहळ्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. रिचा आणि अली शुक्रवारी त्यांच्या कॉकटेल पार्टीत हजर झाले. कार्यक्रमस्थळाच्या बाहेर तैनात असलेल्या माध्यमांसाठी फोटोसाठी पोज दिल्या.
रिचा आणि अलीने रोमँटिक मुडमध्ये फोटोंना पोज दिल्या. अली त्याच्या रंगीबेरंगी शेरवानीमध्ये देखणा दिसत होता, तर रिचाने तिच्या सोनेरी नक्षीदार साडीत लालित्य दाखवले. तत्पूर्वी, गुरुवारी दोघांनी त्यांचा संगीत आणि मेहेंदी सोहळा साजरा केला. त्यांच्या संगीत सोहळ्यातील प्रेमाने भरलेले फोटो त्यांनी पोस्ट केले आहेत. तिथे रिचाने राहुल मिश्राने बनवलेला लेहेंगा निवडला. तर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेला शर्ट घातला होता.
अमृतसरमध्ये जन्मलेल्या आणि दिल्लीत वाढलेल्या रिचाचा दिल्ली शहराशी विशेष संबंध आहे. या रिचाच्या आवडीचे खास पदार्थ पाहुण्यांसाठी मेजवानीमध्ये असणार आहेत. लग्नापूर्वीचा सोहळा दिल्लीत होणार असल्याने या जोडप्याने आपल्या पाहुण्यांना 'दिल्लीवाला' ट्रीटमेंट देण्याचा निर्णय घेतला आहे.