मुंबई- अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी अभिनेत्याची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ताब्यात घेण्यात आले होते. 2020 मध्ये जेव्हा सुशांतचा मृत्यू झाला तेव्हा रिया चक्रवर्ती अभिनेता सुशांतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. सध्या या प्रकरणात रियाला जामीन मिळाला असून तिचे आयुष्य हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, रियाबद्दल एक विचित्र खुलासा झाला आहे. मानवाधिकार वकील सुधा भारद्वाज यांनी अभिनेत्रीबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत.
वकील सुधा यांनी सांगितले की, तुरुंगात असताना रियाने तिचा रुबाब कोणावरही दाखवला नाही. काही दिवस ती तुरुंगात राहिली. याउलट ती कैद्यांशी खूप बोलायची आणि जेलच्या शेवटच्या दिवशी तिने कारागृहातील आपल्या सहकाऱ्यांसाठी नृत्यही केले.
विशेष म्हणजे, मानवाधिकार वकील सुधा भारद्वाज स्वत: गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एका प्रकरणात 3 वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रियाला तुरुंगात खूप नकारात्मक वातावरणाचा सामना करावा लागला, तरीही अभिनेत्रीने स्वतःला सांभाळून ठेवले.
रियाला कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला- मीडियानुसार, सुधाने सांगितले की, 'सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर त्यावेळी खूप गदारोळ झाला होता आणि आम्ही म्हणायचो की या प्रकरणात रियाला बळीचा बकरा बनवला जात आहे. त्यामुळे आम्हाला खूप त्रास व्हायचा, पण नंतर आम्हाला आनंद झाला की रियाला पुन्हा एका स्पेशल सेलमध्ये ठेवण्यात आले, तिला तिथे ठेवण्यात आले जेणेकरून ती टीव्ही पाहू शकत नाही कारण लोक तिथे टीव्ही सुरू ठेवायचे, स्वतःबद्दल खूप वाईट ऐकून तिला खूप दुःख व्हायचे.
सुटकेच्या दिवशी डान्स आणि मिठाई वाटप - ज्या दिवशी रिया तुरुंगातून सुटणार होती त्या दिवशी रिया खूप खुश होती. सुधाने सांगितले की, ती लोकांशी छान बोलायची. अगदी मुलांशीही तिची मैत्री होती. सुधाने सांगितले की, ज्या दिवशी रियाची सुटका होत होती, तिच्याकडे जे काही पैसे होते, त्यातून तिने तुरुंगात मिठाईचे वाटप केले आणि आमच्या सांगण्यावरून परफॉर्मन्सही केला. विशेष म्हणजे सुशांत प्रकरणात ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीला भायखळा तुरुंगात ठेवण्यात आले होते. अभिनेत्रीला 28 दिवसांच्या तुरुंगवासानंतर सोडण्यात आले.
हेही वाचा -जीवाचा थरकाप उडवणारा 'भेडिया'चा थ्रिलर ट्रेलर रिलीज