महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Ved Movie Extended Version : वेड चित्रपटाच्या रिलिजनंतर केले 'हे' बदल, आता सलमानही दिसणार चित्रपटात - Ved Movie New Version

अभिनेता रितेश देशमुखचा दिग्दर्शकिय पदार्पण असलेल्या वेड चित्रपटाने कमाईचा आकडा सतत चढता ठेवला आहे. हा चित्रपट हिट ठरला आहे. परंतु, या चित्रपटातील वेड गाण्याचे नव्याने चित्रिकरण केले आहे आणि चित्रपटाच्या शेवटी असलेले सलमान खानचे गाणे चित्रपटाच्या मधे घेतले आहे. तसेच चित्रपटात तीन सीनदेखील अ‍ॅड करणार आहेत. हा चित्रपट तुम्हाला 20 जानेवारीपासून फक्त 99 रुपयांमध्ये पाहता येणार आहे.

Ved Movie Extended Version
वेड चित्रपट

By

Published : Jan 18, 2023, 6:05 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखचा नुकताच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट वेडने सिनेमागृहांमध्ये जोरदार कमाई सुरु ठेवली आहे. तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाने 6.81 कोटींची कमाई केली आहे. आता अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर चित्रपटप्रेमींसाठी सरप्राईज देण्याची योजना आखली आहे. वेड चित्रपटाची मनभरून प्रशंसा केल्यामुळे आणि चांगला प्रतिसाद दिल्यामुळे रितेशने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

सत्या आणि श्रावणी वेड गाण्यात दिसणार :वेड चित्रपट तुम्हाला 20 जानेवारीपासून फक्त 99 रुपयांमध्ये पाहता येणार आहे. त्यासोबतच या चित्रपटातील वेड गाण्याचे नव्याने चित्रिकरण केले असून त्या गाण्यात सत्या (रितेश देशमुख) आणि श्रावणी (जेनेलिया देशमुख) दिसणार आहे. चित्रपटाच्या शेवटी असलेले सलमान खानचे गाणे चित्रपटाच्या मधे घेतले आहे. तसेच चित्रपटात तीन सीनदेखील अ‍ॅड करणार आहेत. चित्रपट रिलिज झाल्यानंतर असे बदल करताना चित्रपटसृष्टित पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे. या चित्रपटातील गाणे संगीतकार दिग्दर्शक अजय-अतुल यांनी गायले आहेत. मुंबई कंपनी निर्मित फिल्म 'वेड' हा चित्रपट ब्लाॅकबस्टर ठरला.

वेड' ब्लाॅकबस्टर ठरला : सध्या सुरू असलेल्या विकडेजमध्ये चित्रपट 50 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल असा आत्मविश्वास ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी व्यक्त केला आहे. तरण आदर्श यांनी एक ट्विट करुन वेड चित्रपटाच्या कमाईचे लेटेस्ट आकडे सांगितले आहेत. 'मराठी चित्रपट वेडने वीकेंड 3 मध्ये 6.81 कोटी इतक्या उत्कृष्ट कमाईचा आकडा गाठला आहे. या आठवड्याच्या दिवसात चित्रपट ₹50 कोटी पार करेल. पठाण चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होईपर्यंत वेडची घौडदौड कायम राहू शकेल. तिसऱ्या आठवड्यात शुक्रवारी 1.35 कोटी, शनिवारी 2.72 कोटी , रविवारी2.74 कोटी. एकूण: ₹ 47.66 कोटी इतकी कमाई आजवर झाली आहे.' असे तरण आदर्श यांनी लिहिले आहे.

चित्रपटगृहांमध्ये मोठे रेकॉर्ड :वेड हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये मोठे रेकॉर्ड बनवत आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 10 कोटींचा व्यवसाय केला, ज्यामुळे व्यापार तज्ञांना आनंद झाला. पहिल्या आठवड्याची कमाई पाहून ट्रेड पंडितांना वाटले की, दुसऱ्या वीकेंडलाही त्याची कमाई चांगली होईल, मात्र दुसऱ्या वीकेंडमध्ये वेडने असे आकडे नोंदवले आहेत की, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

रितेशच्या वर्कफ्रंटबद्दल :दरम्यान, रितेश नुकताच तमन्ना भाटियासोबत 'प्लॅन ए प्लान बी' या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात दिसला होता. शशांक घोष दिग्दर्शित, या चित्रपटाचा प्रीमियर केवळ नेटफ्लिक्सवर झाला आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तो सोनाक्षी सिन्हा आणि साकिब सलीम सोबत आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट 'काकुडा' मध्ये देखील दिसणार आहे. त्याच्याकडे जेनेलिया डिसूझासोबत 'मिस्टर ममी' हा विनोदी चित्रपट आणि जॉन अब्राहम, नोरा फतेही आणि शहनाज गिल यांच्यासोबत '100%' हा चित्रपटही आहे

ABOUT THE AUTHOR

...view details