मुंबई- बॉलिवूडमधील मुल्क, छिछोरे, इंडिया लॉकडाऊन आणि इतर अनेक चित्रपटातील भूमिकांसाठी परिचीत असलेला अभिनेता प्रतीक बब्बर याने आपल्या आईची आठवण व तिचा अभिनयाचा वारसा जपण्यासाठी स्वतःचे आडनाव प्रतीक पाटील बब्बर असे ठेवले आहे. प्रतीकची आई आणि दिवंगत अभिनेत्री स्मीता पाटील यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मश्री मिळाले आहेत. प्रतीकने त्याच्या सर्व सोशल मीडिया हँडलवर त्याचे नाव देखील बदलले आहे. प्रतीकचे त्याच्या आईसोबतचे नाते नेहमीच प्रेम आणि प्रेरणादायी राहिले आहे. त्याने अनेकदा आईच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रभावाबद्दल नेहमी बोलले आहे.
त्याच्या निर्णयाबद्दल बोलताना प्रतीकने आएएनएसला सांगितले, 'माझ्या वडिलांच्या आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या आशीर्वादाने.. माझ्या दिवंगत आजी-आजोबा आणि माझ्या दिवंगत आईच्या आशीर्वादाने. मी माझ्या आईचे आडनाव माझ्या माझ्या आडनावामध्ये जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यातून माझ्या प्रतीक पाटील बब्बर या स्क्रिन नावाचा नवा जन्म झाला आहे. माझे हे नाव चित्रपटाच्या श्रेय नामावलीत दिसेल तेव्हा मला व प्रेक्षकांसाठी, तिच्या विलक्षण आणि उल्लेखनीय वारशाची आठवण व्हावी अशी माझी इच्छा आहे. वारसा, तिच्या तेज आणि महानतेचे स्मरण'.
प्रतीकने म्हटलंय की, 'त्याच्या आईचे आडनाव पाटील समाविष्ट करण्याचा निर्णय हा तिच्याबद्दलच्या त्याच्या प्रेमाचा आणि आदराचा आणि स्वतःची ओळख आणि मूळ स्वीकारण्याचा एक मार्ग आहे. या नावाच्या बदलातून तो ज्या सामर्थ्यवान वंशाचा आहे त्याचा सन्मान करताना त्याचे व्यक्तिमत्त्व दाखवण्याचा त्याचा हेतू आहे'.
त्याने पुढे नमूद केले की, 'माझी आई माझ्या प्रत्येक प्रयत्नाचा एक भाग असेल की ती आधी एक भाग नव्हती असे नाही, परंतु, माझ्या नावाचा भाग म्हणून तिचे आडनाव असण्याने भावना दृढ होईल. या वर्षी ती आम्हाला सोडून जाऊन 37 वर्षे झाली, गेली पण विसरली नाही. ती कधीच विसरणार नाही याची मी खात्री देतो. स्मिता पाटील माझ्या नावाने अक्षरश: जिवंत राहतील.'