मुंबई : सिने जगताची चांदनी असलेल्या श्रीदेवी यांचा आज स्मृतीदिन आहे. 24 फेब्रुवारी १९१८ ला श्रीदेवीचा दुबईतील जुमैराह एमीरेट्स टॉवर या हॉटेलमध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झाला. मात्र श्रीदेवींने आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपटातून चाहत्यांना भुरळ घातली आहे. आपल्या अदाकारीने श्रीदेवीने हिंदीसह तमीळ, तेलुगु, कन्नड चित्रपटातही आपली छाप पाडली आहे. मात्र त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात रंजक गोष्ट त्यांच्या लग्नाविषयी आहे. विवाहित बोनी कपूरसोबत त्यांनी लग्न केल्यानंतर बॉलिवूडला धक्का बसला होता. तर जाणून घेऊया श्रीदेवीच्या कारकिर्दीबाबत सविस्तर माहिती.
वयाच्या ४ थ्या वर्षी केले अभिनयात पदार्पण :तामीळनाडूतील मिनापट्टी या गावात श्रीदेवी यांचा १३ ऑगस्ट १९६३ ला जन्म झाला आहे. त्यांचे पूर्ण नाव श्री अम्मा यंगर अयप्पन असे आहे. मात्र त्यांना त्यांच्या पहिल्या नावावरुन श्रीदेवी असेच संबोधले जाते. श्रीदेवी यांनी वयाच्या ४ थ्या वर्षीच अभिनयाला सुरुवात केली होती. त्यांनी अभिनय केलेला पहिला चित्रपट कंधन करुणई हा होता. या चित्रपटाच्या माध्यमातून श्रीदेवी यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर श्रीदेवींना लगेच हिंदी चित्रपट सृष्टीतही अभिनय करण्याची संधी मिळाली. रानी मेरा नाम या चित्रपटातून श्रीदेवींनी हिंदी चित्रपटात पदार्पण केले. त्यानंतर तब्बल तीन दशके श्रीदेवींनी बॉलिवूडवर राज्य केले. हिम्मतवाला या चित्रपटाने श्रीदेवींना अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर तर जितेंद्र आणि श्रीदेवीची जोडी तुफान लोकप्रिय झाली.
बॉलिवूडची चांदणी :हिम्मतवाला चित्रपटाने श्रीदेवीला घराघरात पोहोचवले. त्यानंतर श्रीदेवीने तब्बल तीन दशके बॉलिवूडवर अधिराज्य केले. श्रीदेवीला आपल्या चित्रपटात अभिनेत्री म्हणून साईन करण्यासाठी निर्मात्यांनी श्रीदेवीला पहिली पसंती दिली. निर्माता ऋषी कपूर आणि श्रीदेवी यांच्या आलेल्या चांदनी या गाण्यामुळे तर श्रीदेवीला बॉलिवूडमधील चांदणी म्हणूनच संबोधले जाऊ लागले.