मुंबई : रणवीर सिंग आणि आलिया भट्ट स्टारर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता 28 जुलै रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. यापूर्वी हा चित्रपट 28 एप्रिल रोजी रिलीज होणार होता. गेल्या वर्षी 13 नोव्हेंबर रोजी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सोबत 'ए दिल है मुश्किल' या शेवटच्या आऊटिंगनंतर दिग्दर्शनाकडे परतणारा बॉलीवूड निर्माता करण जोहरने हा चित्रपट 28 एप्रिलला प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली होती.
करण जोहरने रिलीजची नवीन तारीख केली जाहीर :गुरुवारी करण जोहरने या चित्रपटाची नवीन रिलीजची तारीख इंस्टाग्रामवर जाहीर केली. त्याने इंस्टाग्रामवर लिहिले, 'ते म्हणतात ना सबर का फल मिठा होता है', म्हणून या अविश्वसनीय खास म्हणेचा परिपूर्ण अर्थ जाणून घेण्यासाठी आम्ही या चित्रपटाची तारीख लांबवली आहे. हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. तुमची मिठास वाढवण्यासाठी त्याने कॅप्शन देऊन लिहले आहे, 'आम्ही खूप प्रेम घेऊन येत आहोत' रॉकी और रानी के परिवार हो रहे है तैय्यार, और अब देखिए ये अनोखी कहानी प्यार की!'
रणवीर सिंगने इंन्स्टावर केली पोस्ट शेअर :रणवीरने इंस्टाग्रामवर जाऊन लिहिले: क्यूंकी हा चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल कारण हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. ज्यांचे आपल्या कुटुंबावर प्रेम आहे, त्या सर्वांसाठी हा चित्रपट मेजवानी ठरणार आहे. यातील मनोरंजन सर्व जणांसाठी जे कुटुंबावर प्रेम करणाऱ्यांसाठी असणार आहे. 'राॅकी आणि रानीची प्रेमकहाणी' सिनेमागृहात, 28 जुलै 2023." आलियानेदेखील नवीन रिलीजची तारीख जाहीर करणारे पोस्टर शेअर केले आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी 28 जुलै 2023 रोजी रिलीज होत आहे.'
जुन्या प्रसिद्ध स्टारच्या चित्रपटात भूमिका :'रॉकी और रानी की प्रेम कहानी', एक रोमँटिक कॉमेडी असलेला चित्रपट आहे. यात लेजेंड धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्याही भूमिका भूमिका असणार आहेत. संगीत दिग्दर्शक म्हणून प्रीतम आणि गीतकार म्हणून अमिताभ भट्टाचार्य असणार आहेत. जुन्या प्रमुख कलाकारांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने आता प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली आहे.
'पठाण' चित्रपटामुळे रिलीज तारीख लांबणीवर :'पठाण'ने अनेक चित्रपटांचे रेकाॅर्डब्रेक करीत चांगलीच कमाई केली. अजून चित्रपट जोरात चालत असल्यामुळे अर्थात इतर चित्रपट कमी पडणार आहेत. त्यामुळे याचा फटका आपल्या चित्रपटाला बसू नये म्हणून करण जोहरने आपल्या चित्रपटाची तारीख लांबवली आहे. याप्रमाणे शहजादा चित्रपटाची तारीखसुद्धा लांबवली आहे.