मुंबई -बॉलिवूडमधील प्रख्यात गायक आणि गझलकार भूपिंदर सिंह यांचं आज निधन झालं. पत्नी मिताली सिंह यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते अनेक आजारांचा सामना करत होते, त्यांना युरिनरी इन्फेक्शनही झालं होतं. अखेर आज मुंबईमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला -प्रख्यात गायक आणि गझलकार भूपिंदर सिंह यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी गायलेली काही गाणी आणि गझला अविस्मरणीय असून नवोदित गायकांना भूपिंदर सिंह यांचा प्रवास मार्गदर्शक ठरेल, असेही मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणाले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला -ज्येष्ठ पार्श्वगायक भूपिंदर सिंग यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. आपल्या आवाजाने आम्हाला अनेक अविस्मरणीय गाणी दिली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे.संगीत क्षेत्रातील आपले योगदान कायम स्मरणात राहणार आहे. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांना माझ्या मनापासून संवेदना. विनम्र श्रद्धांजलि, असेही उपमुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणाले आहे.
कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी शोक व्यक्त केला -दिग्गज गायक भूपिंदर सिंह राहिले नाहीत, हे जाणून खरच दु:ख झाले आहे. आपल्या अनोख्या मधुर आवाजाने आणि मनमोहक गाण्यांनी त्यांनी चित्रपट तसेच संगीत क्षेत्रात आपली छाप सोडली. मी त्यांचा वर्षानुवर्षे चाहता आहे. "दिल धुंदता है" हे गाणे नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ राहील. कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी शोक व्यक्त केला आहे.
नाना पटोले यांनी शोक संदेशात लिहीले - करोगे याद तो, हर बात याद आयेगी, गुज़रते वक़्त की, हर मौज ठहर जायेगी ! प्रसिद्ध गझल गायक भूपेंद्र सिंह यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्राची अपरिमित हानी झाली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी नेते नाना पटोले यांनी शोक संदेशात लिहीले आहे.
ही गाणी होती प्रसिद्ध-१९६२ मध्ये दिग्गज संगीत दिग्दर्शक मदन मोहन यांनी त्यांना गाताना ऐकले आणि मुंबईत बोलावले व ‘हकीकत’ या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. “नाम गुम जायेगा”, “दो दिवाने शहर में”, “आने से उसके आयी बहार”, “करोगे याद तो”, “मीठे बोल बोले”, “एक अकेला इस शहर में”, मोहम्मद रफी, तलत मेहमूद, मान्ना डे यांच्या सोबत गायलेले “होके मजबूर मुझे, उसने बुलाया होगा” ही त्यांची काही प्रसिद्ध गाणी आहेत. “दुक्की पे दुक्की हो या हो सत्ता पे सत्ता” सारखे उडत्या चालीचे गाणेही त्यांच्या नावावर आहे. भूपिंदर सिंह यांनी अनेक प्रसिद्ध संगीतकारांसाठी पार्श्वगायन केले आहे ज्यात “दुनिया छुटे, यार ना छुटे”, “बीती ना बितायी रैना”, “हुजूर इस कदर भी ना इतरा के चलिए”, “कभी किसीको मुकम्मल जहाँ नहीं मिलता”, “जिंदगी मेरे घर आना” या गाण्यांचा समावेश आहे. तसेच ते इतर भारतीय भाषांमध्येसुद्धा गायले असून गाण्याव्यतिरिक्त त्यांनी अनेक गाण्यांसाठी गिटार आणि व्हायोलिन देखील वाजवले आहे. प्रसिद्ध गझल गायक भूपिंदर सिंह यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतील आणि संगीतक्षेत्रातील अनेकांनी त्यांच्या कुटुंबाला शोकसंदेश पाठविले आहेत.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना- प्रख्यात गायक आणि गझलकार भूपिंदर सिंह यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी गायलेली काही गाणी आणि गझला अविस्मरणीय असून नवोदित गायकांना भूपिंदर सिंह यांचा प्रवास मार्गदर्शक ठरेल असेही मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात. भूपिंदर सिंह हे प्रामुख्याने गझल गायकीसाठी ओळखले जात असले तरी त्यांनी अनेक चित्रपटांतून पार्श्वगायन केलेले आहे. “मौसम”, “सत्ते पे सत्ता”, “आहिस्ता आहिस्ता”, “दूरियां”, “हकीकत” आणि अनेक चित्रपटांमधील त्यांच्या संस्मरणीय गाण्यांसाठी त्यांना लक्षात ठेवले जाईल. “कभी किसी को मुकम्मल”, “किसी नजर को तेरा इंतेझार आज भी है” आणि “दिल धुंडता है” यांसारख्या सदाबहार गाण्यांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ पार्श्वगायक भूपिंदर सिंग यांनी त्यांचे वडील नाथा सिंहजी, जे एक सुप्रसिद्ध गायक होते, यांच्याकडून सांगीतिक प्रशिक्षण घेतले होते. भूपिंदर यांनी तरुणपणातच गिटार आणि व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली होती. भूपिंदर सिंह हे काही वर्ष दिल्ली दूरदर्शनशीही संलग्न होते.
हेही वाचा -Bhupinder singh passes away : 'नाम गुम जायेगा' गायक भूपिंदर सिंह यांचे ८२ व्या वर्षी निधन; अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार