महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

प्रथमेश परबचा 'अन्य'मध्ये रावडी लूक, भूमिकेसाठी घेतली कठोर मेहनत - Prathamesh Parab took hard work

कोणतीही भूमिका एकरूप होऊन केली की ती प्रेक्षकांपर्यंत अगदी सहजपणे पोहोचते असं प्रथमेश परब मानतो. 'अन्य'मधील कॅरेक्टरही लोकांपर्यंत अगदी सहजपणे पोहाचवता यावं यासाठीच रेड लाईट एरियाला भेट दिल्याचं प्रथमेशचं म्हणणं आहे. यात प्रथमेशची भूमिका अत्यंत वास्तववादी असून, कथानकात महत्त्वाची भूमिका बजावणारी आहे.

प्रथमेश परब
प्रथमेश परब

By

Published : Jun 8, 2022, 5:37 PM IST

विनोदी चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेला कलाकार प्रथमेश परब सिरीयस भूमिकांसाठी देखील जाणला जातो. आता तो एका वास्तववादी भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुढील आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 'अन्य' या हिंदी-मराठी चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठीही प्रथमेशनं अत्यंत कठोर मेहनत घेतली आहे. काही कलाकार चित्रपटातील आपल्या कॅरेक्टरला योग्य न्याय देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मेहनत किंवा रिस्क घ्यायला मागे पुढे पहात नाहीत. मराठीसोबतच हिंदीतही सक्रीय असणारा महाराष्ट्राचा लाडका प्रथमेश परबही याबाबतीत नेहमी आघाडीवर असतो. आपल्या वाट्याला आलेलं काम अत्यंत प्रामाणिकपणे करायचं आणि त्यासाठी वाट्टेल ती मेहनत घ्यायची हा प्रथमेशला आजवर मिळालेल्या यशाचा मंत्र आहे.

प्रथमेशनं साकारलेला दगडू जसा महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय झाला तसंच 'अन्य'मधीलही त्याचं कॅरेक्टर लोकप्रिय होणार आहे. त्यात प्रथमेश केवळ रोमँटिक मूडमध्ये होता, पण आता त्याचा रावडी लुक पहायला मिळणार आहे. वास्तववादी घटनांवर आधारलेल्या 'अन्य'मध्ये समाज विघातक रॅकेटचा पर्दाफाश करण्याची कामगिरी हाती घेण्यात येते. यासाठी हेरगिरी करण्याची जबाबदारी प्रथमेशकडे सोपवण्यात येते. चित्रपटात हे कॅरेक्टर रिअल वाटावं यासाठी प्रथमेशनं चक्क दिल्लीतील रेड लाईट एरियात जाऊन पाहणी केली होती.

प्रथमेश परब

कोणतीही भूमिका एकरूप होऊन केली की ती प्रेक्षकांपर्यंत अगदी सहजपणे पोहोचते असं प्रथमेश मानतो. याच कारणासाठी आपण ज्या प्रकारची व्यक्तिरेखा साकारतो त्याचं राहणीमान, त्याचा स्वभाव, त्याची बोलीभाषा आत्मसात करण्यासाठी प्रथमेश नेहमीच सज्ज असतो. 'अन्य'मधील कॅरेक्टरही लोकांपर्यंत अगदी सहजपणे पोहाचवता यावं यासाठीच रेड लाईट एरियाला भेट दिल्याचं प्रथमेशचं म्हणणं आहे. यात प्रथमेशची भूमिका अत्यंत वास्तववादी असून, कथानकात महत्त्वाची भूमिका बजावणारी आहे.

प्रथमेश परब

दक्षिणात्य दिग्दर्शक सिम्मी जोसेफ यांनी 'अन्य'चं दिग्दर्शन केलं असून, लेखनही त्यांचंच आहे. संवादलेखन महेंद्र पाटील यांनी केलं असून, सिनेमॅटोग्राफी सज्जन कालाथील यांची आहे. या चित्रपटात प्रथमेशच्या साथीला रायमा सेन, अतुल कुलकर्णी, प्रथमेश परब, तेजश्री प्रधान, भूषण प्रधान, कृतिका देव, सुनील तावडे, यशपाल शर्मा आणि गोविंद नामदेव आदी कलाकार दिसणार आहेत.

निर्माते शेलना के. आणि सिम्मी यांनी इनिशिएटीव्ह फिल्म्सच्या बॅनऱखाली कॅपिटलवुडसच्या सहयोगानं 'अन्य'ची निर्मिती केली आहे जो येत्या १७ जून ला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -‘इंडियन आयडॉल’मधील सलमान अलीने मराठी ‘अन्य’ साठी केले पार्श्वगायन!

ABOUT THE AUTHOR

...view details