महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

उर्वशी रौतेला ते रविना टंडन, वर्ल्ड कपसाठी ''या' बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिल्या भारतीय संघाला शुभेच्छा - वर्ल्ड कप ट्रॉफी अंतिम सामाना 2023

World Cup 2023 Final : भारत आणि ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट विश्वचषकामधील अंतिम सामना थोड्या वेळात सुरू होणार आहे. याआधी अनेक सेलिब्रिटींनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

World Cup 2023 Final
वर्ल्ड कप अंतिम सामाना 2023

By ANI

Published : Nov 19, 2023, 1:07 PM IST

मुंबई - World Cup 2023 Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट विश्वचषक 2023 चा अंतिम सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक २०२३ च्या फायनलची क्रेझ प्रत्येक क्षणी वाढताना दिसत आहे. भारतीय क्रिकेट संघानं उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया संघानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. वर्ल्डकपचा ​अंतिम सामना 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी भारत आपला सर्वोत्तम देण्याचा आज प्रयत्न करेल.

सेलिब्रिटींनी दिला शुभेच्छा :दरम्यान वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी बॉलिवूड सेलिब्रिटीही खूप उत्सुक दिसत आहे. अभिनेता सोनू सूदनं बोलताना सांगितलं की, ''टीम इंडियाचे अ‍ॅडवान्समध्ये अभिनंदन... मला माहित आहे की जेव्हा असे तेजस्वी खेळाडू अंतिम फेरीत येतात, तेव्हा विजय निश्चित असतो. संपूर्ण देश, 140 कोटी जनता तुमच्या विजयासाठी प्रार्थना करत आहे." दरम्यान, रामायण फेम अभिनेता अरुण गोविलनं या सामन्याबद्दल उत्साह व्यक्त करत म्हटलं आहे की , "भारतीय क्रिकेट संघानं २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत इतर संघांना पराभूत करून सलग १० सामने जिंकले. फायनलमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवेल, अशी आशा आहे. माझ्या संपूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा."

वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी बॉलिवूड सेलिब्रिटी उत्सुक :उर्वशी रौतेलानेही या सामन्याबद्दल उत्सुकता व्यक्त केली. तिनं म्हटलं की, ''मी खूप उत्साहित आहे. मला माहित आहे की टीम इंडिया नक्कीच ट्रॉफी घेऊन येईल. उर्वशी रौतेला मॅच पाहण्यासाठी अहमदाबादला पोहोचली आहे. अभिनेत्री रवीना टंडननेही टीम इंडियाचे अभिनंदन करत म्हटलं की, ''ऑल द बेस्ट टीम इंडिया. लेहरा दो तिरंगा. जय हिंद जय भारत'' याशिवाय 'पुलकित सम्राट म्हटल की, ''आज राष्ट्रीय सुट्टी आहे आणि रात्री संपूर्ण देश टीम इंडियाच्या विजयाचा आनंद साजरा करेल. आमच्या प्रार्थना टीम इंडियासोबत आहेत''. नुसरत भरुचा टीम इंडियाला शुभेच्छा देत म्हटलं, "ही विश्वचषक फायनल आहे. सर्वांप्रमाणेच मीदेखील या सामन्याबद्दल खूप उत्सुक आहे. आतापर्यंत भारतानं विश्वचषकात चांगली कामगिरी केली आहे. मला या संपूर्ण संघाचा अभिमान आहे. हा सर्वोत्तम भारतीय संघ आहे. आम्ही विश्वचषक ट्रॉफी जिंकू". याशिवाय आयुष्मान खुराना, अनुपम खेर अनिल कपूरनेही भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा :

  1. मल्याळम अभिनेता विनोद थॉमसचा संशयास्पद मृत्यू, कारमध्ये आढळला मृतदेह
  2. भारत आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषक अंतिम सामान्यात आयोजित 'हे' खास शो
  3. कतरिना कैफ उत्कृष्ट अभिनेत्रीसोबत 'या' ब्रँडची आहे मालकीन

ABOUT THE AUTHOR

...view details