महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Rashmika Mandanna : रश्मिका मंदान्नाचा कॅज्युएल अवतार, विमानतळावर झाली क्लिक - विजय देवराकोंडा आणि रश्मिका

रश्मिका मंदान्ना मुंबई विमानतळावर नुकतीच दिसली. तिने यावेळी मेकअप केला नव्हता किंवा दागिनेही घातले नव्हते. तिचा हा साधेपणा तिच्या सौंदर्यात भर घालत होता.

Rashmika Mandanna
रश्मिका मंदान्ना

By

Published : Jul 20, 2023, 5:48 PM IST

मुंबई -अभिनेत्री रश्मिका मंदाना जेव्हाही नजरेस पडते तेव्हा पापाराझी तिला आपल्या कॅमेऱ्यात क्लिक करण्यासाठी धडपडत असतात. नुकतेच, मुंबई विमानतळावर तिला पाहताच अशीच तारांबळ पापाराझींची उडाली. कॅज्युएल आऊटफिटमध्ये रश्मिका कोझी लूकमध्ये दिसत होती.

पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रश्मिका क्रिम कलरच्या ट्राऊजर्ससह पांढऱ्या टोपीमध्ये विमानतळावर अवतरली. तिने मेकअपला विश्रांती दिली होती व दागिनेही परिधान केले नव्हते. मात्र तिच्या हातामध्ये पुस्तक घेतले होते व आपले केस मागे बांधले होते. तिचा एकंदरीत लूक अतिशय साधा आणि सुंदर होता व तिच्या चेहऱ्यावर छान स्मितहास्य होते.

तिचा हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत. मेकअप शिवायही ती किती सुंदर दिसते, अशा काहींच्या प्रतिक्रिया आहेत. ती प्रत्येक भारतीयाची क्रश लव्ह असल्याचे एकाने म्हटलंय. रश्मिकाच्या सौंदर्याचे अनेकांनी रसभरीत वर्णन केले आहे.

विजय देवराकोंडा आणि रश्मिका यांच्यात डेटिंग सुरू असल्याच्या चर्चा नेहमी आकायला मिळत असतात. अलिकडेच विजयचा भाऊ आनंद देवराकोंडाचा बेबी हा तेलुगु चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या प्रीमियरला विजयसोबत रश्मिका मंदान्ना हजर होती. हा चित्रपट खूप आवडल्याचे तिने नंतर सांगितले होते.

अल्लु अर्जुनच्या 'पुष्पा २' चित्रपटाच्या कामात ती सध्या गुंतली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसापूर्वी प्रदर्शित झाला होता. 'पुष्पा २' मधील तिच्या भूमिकेबाबत अधिक समजून घ्यायला, तिचे चाहते उत्सुक आहेत. यात ती पुन्हा एकदा श्रीवल्ली ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. रणबीर कपूरसोबत रश्मिका 'अ‍ॅनिमल' या आगामी चित्रपटातही काम करत आहे. 'कबीर सिंग' फेम दिग्दर्शक संदिप वंगा रेड्डी यांचा हा चित्रपट १ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. 'मैं आऊंगी युपी बिहार लुटने' या आगामी चित्रपटात ती शाहिद कपूरसोबत काम करणार आहे. अनिस बज्मी बनवत असलेला हा एक रोमँटिक चित्रपट असेल. या चित्रपटाचे शुटिंग ऑगस्टमध्ये सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा -

१.Sonu Sood : सोनू सूदचा 'संकल्प', देणार मोफत कायदा प्रशिक्षण!

२.Samantha Ruth Prabhu : सामंथा रुथ प्रभूच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन...

३.Aditya Roy Kapur And Ananya Panday : 'लव्हबर्ड्स' परतले,अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर मुंबई विमातळावर स्पॉट...

ABOUT THE AUTHOR

...view details