महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

रश्मिका मंदान्नानं उलडलं 'अ‍ॅनिमल'मधील गीतांजलीचं व्यक्तीमत्व, कणखर स्त्रीत्वाचा दिला दाखला

Rashmika character in Animal : 'अ‍ॅनिमल' चित्रपटात रश्मिका मंदान्नानं गीतांजली या शांत, संयमी व्यक्तीची भूमिका साकारली आहे. परंतु ही व्यक्तीरेखा एका कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या कणखर स्त्रीची कशी आहे याचा खुलासा तिनं केला आहे.

Animal Box Office India Collection
'अ‍ॅनिमल'मधील गीतांजलीचं व्यक्तीमत्व

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 9, 2023, 11:44 AM IST

मुंबई - Rashmika character in Animal 'अ‍ॅनिमल'या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत दिसणारी रश्मिका मंदान्ना तिच्या व्यक्तिरेखेबद्दल भरभरुन बोलली. चित्रपटाला इतके प्रेम दिल्याबद्दल तिनं चाहत्यांचे आभार मानले आहेत.

तिने इंस्टाग्रामवर हँडलवर 'अ‍ॅनिमल'चित्रपटातील काही पडद्यामागील फोटो तिने शेअर केले आणि तिच्या व्यक्तिरेखेबद्दल लिहिले, "गीतांजली... तिचे एका वाक्यात वर्णन करायचं झाले तर मी म्हणेन घरातील सर्वांना एक बांधून ठेवणारी एक शक्ती. ती शुद्ध, खरी, बिनधास्त, सशक्त आणि कणखर आहे.. कधी कधी एक अभिनेत्री म्हणून मी गीतांजलीच्या काही कृतींवर प्रश्न विचारत असे.. आणि मला आठवते की माझ्या दिग्दर्शकाने मला सांगितले होतं, की रणविजय आणि गीतांजलीची ही कथा आहे. त्यांचे प्रेम आणि उत्कटता, त्यांचे कुटुंब आणि त्यांचे जीवन याची गोष्ट आहे."

रश्मिका पुढे म्हणाली, "सर्व हिंसा, दुखापत आणि असह्य वेदनांनी भरलेल्या जगात - गीतांजली शांतता आणि थंडपणा आणते.. ती आपल्या पती आणि तिच्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी तिच्या देवांना प्रार्थना करते. ती सर्व वादळांचा सामना करते. ती तिच्या कुटुंबासाठी काहीही करायला तयार असते."

चित्रपटातील तिचे पात्र आजच्या सशक्त आणि स्वतंत्र असलेल्या स्त्रियांशी कसे संबंधित आहे हे तिने पुढे सांगितले. "गीतांजली माझ्या नजरेत अतिशय सुंदर आहे, आणि काही अर्थाने ती सर्वसामान्य महिलांसारखी आहे ज्या मजबूत उभ्या आहेत आणि दिवसेंदिवस आपल्या कुटुंबाचे रक्षण करत आहेत.."

कृतज्ञता व्यक्त करून, तिने समारोप केला, "आमच्या पहिल्या आठवड्यासाठी 'अ‍ॅनिमल'टीमला शुभेच्छा. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद.. यामुळेच मला प्रत्येक चित्रपटात अधिक मेहनत करण्यास प्रवृत्त करते... तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. "

रिलीजच्या अवघ्या 1 आठवड्यात 'अ‍ॅनिमल' चित्रपटाने 300 कोटींच्या क्लबमध्ये यशस्वीपणे प्रवेश केला आहे. इंस्टाग्रामवर व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी एक पोस्ट शेअर केली. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, " 'अ‍ॅनिमल'सनसनाटी आहे... पहिल्या आठवड्यामध्ये एक विलक्षण टोटल पॅक केली आहे... आजवर चित्रपटासाठीचे तिसरे सर्वात मोठे 7 दिवस. सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या चित्रपटासाठी सर्वात मोठे 7-दिवस. दुसर्‍या चित्रपटाशी टक्कर झालेल्या चित्रपटासाठीचे सर्वात मोठे 7-दिवस. सर्वाधिक कमाई करणारा 'A' प्रमाणित चित्रपट. 'अ‍ॅनिमल'बॉक्स ऑफिस कलेक्शन शुक्र 54.75 कोटी, शनि 58.37 कोटी, रविवार 63.46 कोटी, सोम 40.06 कोटी, मंगळ 34.02 कोटी, बुध 27.80 कोटी, गुरु 22.35 कोटी. एकूण: रु 300.81 कोटी. हिंदी आवृत्ती. नेट बीओसी. बॉक्सऑफिस."

गुरुवारी, चित्रपटाने हिंदी भाषेत 22.35 कोटी रुपयांची कमाई केली ज्यामुळे चित्रपटाचे भारतातील एकूण हिंदी कलेक्शन 300.81 कोटी रुपये झाले. सर्व भाषांमध्ये (तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम) चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या एका आठवड्यात भारतात 338.63 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

8 व्या दिवशी तिकीट विक्रीमध्ये थोडीशी घट दर्शवित आहे. थिएटरमध्ये एक आठवडा झाल्यानंतरही, चित्रपटाने प्रेक्षक आकर्षित करणे सुरूच ठेवले. भारतात प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी 23.34 कोटी रुपयांची प्रभावी कमाई केली. यामुळे देशांतर्गत बाजारात तिची एकूण कमाई 362.11 कोटी झाली आहे.

हेही वाचा -

1. 'अ‍ॅनिमल'ने 7 दिवसात जमवला 563.3 कोटीचा गल्ला, तिकीट बारीवर गर्दी कायम

2.धर्मेंद्रने चाहत्यांसोबत साजरा केला वाढदिवस, सनी बॉबीसह 'ड्रीम गर्ल'नेही दिल्या शुभेच्छा

3.झोया अख्तरच्या डिनर पार्टीत सुहाना, अगस्त्य आणि खुशी कपूरसह 'द आर्चिज' गँगची हजेरी

ABOUT THE AUTHOR

...view details