मुंबई - अभिनेत्री रश्मिका मंदान्ना गेली पाच दिवस मालदीवमध्ये कथित प्रियकर विजय देवराकोंडासोबत सुट्टीचा आनंद घेत होती. निळाशार समुद्रावरील अनेक फोटो तिने याकाळात चाहत्यांसाठी शेअर केले होते. मात्र तिने विजयसोबत फिरताना किंवा एन्जॉय करतानाचे फोटो शेअर करणे टाळले होते. अखेर ती मुंबईत परतली आहे. विमानतळावरुन बाहेर पडताना ती एकटीच दिसली. विजयही मीडियाच्या नजरा चुकवत पसार झाला.
मालदीव सोडण्यापूर्वी रश्मिकाने इंस्टाग्रामवर एक फोटोही शेअर केला आणि लिहिले, "खूप अत्यावश्यक सुट्टीला निरोप देण्याची वेळ आली आहे. या ठिकाणाला गुडबाय करणे मनाला जड जात आहे."
शनिवारी अभिनेत्रीने एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये ती फ्लोटिंग ब्रेकफास्टचा आस्वाद घेताना दिसत आहे. तिने फोटो टाकल्यानंतर लगेचच, सोशल मीडियावरील काही उत्साही चाहत्यांनी असा निष्कर्ष काढला की हा फोटो विजयने क्लिक केला आहे आणि तिला त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर करण्यास सांगितले होते.
रश्मिकाचा गुडबाय हा चित्रपट गेल्या आठवड्यात रिलीज झाला. त्याच दिवशी ती विस्रांतीसाठी मालदीवला रवाना झाली होती. विशेष म्हणजे ती विमानतळावर एकटीच दाखल झाली व त्यानंतर विजय देवराकोंडाही एकटाच जाऊन विमानात बसला होता. पुढचे पाच दिवस हे जोडपे सुट्टीच्या नंदनवनात एन्जॉय करत होते.
विजय क्वचितच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असताना, रश्मिकाने तिच्या चाहत्यांना मालदीवच्या सुट्टीतील मिरर सेल्फीसह "हाय लव्हज" लिहिले होते. विजय आणि रश्मिका यांनी त्यांचे नाते लपवून ठेवले आहे. या जोडप्याने नेहमीच सांगितले की ते फक्त चांगले मित्र आहेत त्यांच्या डेटिंगच्या अफवा वारंवार येत राहतात.
रश्मिका आणि विजयने दोन तेलुगू चित्रपटांमध्ये स्क्रीन स्पेस शेअर केली आहे. त्यांचा गीता गोविंदम प्रचंड गाजला होता, तर डियर कॉम्रेडला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. दोघेही बहुतेकदा मित्रांसोबत सुट्टीवर जातात पण त्यांची व्हॅकेशन डायरी सोशल मीडियापासून दूर ठेवतात. दोघांच्याही चाहत्यांना आशा आहे की ते त्यांच्या नातेसंबंधाची अधिकृत घोषणा करतील.
हेही वाचा -क्रिकेटर शिखर धवनची बॉलिवूड एन्ट्री, फिल्ममधील फोटो व्हायरल