हैदराबाद:अभिनेत्री रश्मिका मंदान्नानी पुष्पा: द राइज या चित्रपटात काम केले. या चित्रपटातील श्रीवल्ली भूमिका ही चाहत्यांना फार आवडली होती. कारण पहिल्यांदा रश्मिका ही एका वेगळ्या भूमिकेत पडद्यावर झळकणार होती. आता सध्या पुन्हा एकादा या चित्रपटावरून रश्मिका चर्चेत आली आहे. या चित्रपटातील श्रीवल्लीच्या भूमिकेबद्दल ऐश्वर्या राजेशने एक कमेंट केली आहे. ऐश्वर्याने रश्मिकाच्या व्यक्तिरेखेचा संदर्भ देताना तिचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी एक विधान जारी केल्यानंतर, यावर रश्मिकाने उत्तर दिले आहे.
ऐश्वर्या राजेशनी केली रश्मिका मंदान्नाला कमेंट : पुष्पा: द राइजमधील रश्मिकाच्या भूमिकेबद्दल बोलणाऱ्या ऐश्वर्याने यावर जोर दिला की ती या भूमिकेत रश्मिकापेक्षा चांगली कामगिरी करू शकले असते. तिच्यासाठी ही भूमिका योग्य होती. त्यानंतर तिने म्हटले की, तिच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे आणि रश्मिकाच्या कार्याबद्दल ती अत्यंत आदर करते. याशिवाय काहीही नाही. तिने एका मुलाखतीत सांगितले की, 'मला तेलगू सिनेमात कोणत्या प्रकारच्या भूमिका करायच्या आहेत. नंतर तिने सांगितले की, मला तेलुगू फिल्म इंडस्ट्री खूप आवडते आणि मी नक्कीच तेलुगू सिनेमा काम करेन. जर मला माझ्या आवडीच्या भूमिका मिळाल्या तर मी तेलगू सिनेमा करेल त्यानंतर तिने म्हटले की, एक उदाहरण सांगायचे झाले तर, मी म्हणाले की मला पुष्पामधील श्रीवल्लीचे पात्र खूप आवडले कारण मला असे वाटले की अशी पात्रे मला शोभतील. त्यानंतर तिने सोशल मीडियावर लिहले की, 'तथापि, दुर्दैवाने, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे असे मला दिसत आहे. तसेच मला असे वाटत आहे की, रश्मिका मंदान्नाच्या विलक्षण कामाचा अपमान करणाच्या गोष्टी या पसरविल्या जात आहे.'