महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Rashmika Mandanna : मॅनेजरसोबतच्या भांडणावर रश्मिका मंदान्नाने केला खुलासा... - Rashmika Mandanna opens up on feud

मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की, रश्मिका मंदान्नाच्या मॅनेजरने तिची 80 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. रश्मिकाला हे संपूर्ण प्रकरण फार मोठे बनवायचे नाही, म्हणून तिने हे प्रकरण आपल्या पद्धतीने हाताळले आहे.

Rashmika Mandanna
रश्मिका मंदान्ना

By

Published : Jun 23, 2023, 5:36 PM IST

मुंबई : साऊथ सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने 'गुडबाय' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. ही रश्मिका लवकरच रणबीर कपूरसोबत 'एनिमल'मध्ये दिसणार आहे. सध्याला रश्मिका ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना ही 80 लाखांच्या फसवणुकीची शिकार झाली असे सांगण्यात येत आहे. ज्या व्यक्तीने फसवणूक केली तो दुसरा कोणी नसून तिचा मॅनेजर असल्याचे म्हटले जात आहे. मॅनेजरने रश्मिकाचे 80 लाख रुपये चोरल्याचा आरोप केल्या गेला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच रश्मिकाला प्रचंड राग आला आणि तिने मॅनेजरला तडकाफडकी कामावरून काढून टाकले. आता रश्मिका आणि तिच्या मॅनेजरने एक निवेदन जारी करून बातमीची सत्यता सांगितली आहे. रश्मिकाच्या मॅनेजरने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 80 लाखांच्या फसवणुकीबाबत जी काही अफवा पसरवली गेली आहे ती पूर्णपणे खोटी आहे. पुढे ते म्हणाले की ते वेगळे झाले आहेत, परंतु हे परस्पर संमतीने झाले आहे आणि सर्व काही अतिशय व्यावसायिक आहे. त्यांच्यात काही शत्रुत्व असे काही नाही.

रश्मिका काय म्हणाली? : जारी केलेल्या निवेदनात असे लिहिले आहे, 'आमच्यामध्ये कोणतीही नकारात्मकता नाही. आम्ही आमच्या स्वतःच्या इच्छेने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही कसे वेगळे होत आहोत या अफवांमध्ये काहीही तथ्य नाही. आम्ही पूर्णपणे व्यावसायिक आहोत आणि आतापासूनच हे ठरवले आहे की आम्ही स्वतंत्रपणे काम आता करू शकतो. रश्मिका आणि तिच्या मॅनेजरने गुरुवारी २२ जून रोजी याची घोषणा केली आहे.

काय होतं संपूर्ण प्रकरण? :नुकतेच एका मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की, रश्मिका मंदान्नाच्या मॅनेजरने तिची 80 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. रश्मिकाला हे संपूर्ण प्रकरण फार मोठे बनवायचे नाही, म्हणून तिने हे प्रकरण आपल्या पद्धतीने हाताळले आहे.

वर्कफ्रंट :रश्मिका मंदान्ना बद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती रणबीर कपूरसोबत तिच्या आगामी 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतेच या चित्रपटातील अभिनेत्याचे फर्स्ट लूक पोस्टर समोर आले असून प्री-टीझरने रिलीजसोबतच चाहत्यांच्या उत्साहात भर घातली आहे. हा सिनेमा 11 ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

हेही वाचा :

  1. Bigg Boss OTT 2: पूजा भट्टने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल केले स्फोटक खुलासे
  2. Adipurush Box Office collection: 'आदिपुरुष' चित्रपटाला मिळाला नाही दिलासा , देशांतर्गत पहिल्या आठवड्यात २६० कोटींची कमाई
  3. SRK daughter Suhana Khan : शाहरुखची पोरगी सुहाना खानने 'शेतकरी' म्हणून खरेदी केली अलिबागमध्ये जमीन

ABOUT THE AUTHOR

...view details