मुंबई- साऊथ स्टार अभिनेत्री रश्मिका मंदान्ना अलिकडेच हिंदी स्पाय थ्रिलर मिशन मजनू (२०२३) मध्ये झळकली होती. साऊथमध्ये असंख्य चित्रपटातून यशस्वी कामगिरी केलेल्या अभिनेत्री रश्मिकाने आपला सुरूवातीपासूनच्या मॅनेजरला काढून टाकले आहे. तिच्या दीर्घकालिन सेवेत असलेल्या मॅनेजरने ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाल्यानंर रश्मिकाने हे पाऊल उचलल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार व्यवस्थापकाने रश्मिकाची 80 लाख रुपयांची फसवणूक केली. मात्र, रश्मिकाने अद्याप या घटनेवर आपली भूमिका किंवा प्रतिक्रिया दिलेली नाही. रश्मिका मंदान्नाची तिच्या मॅनेजरकडून ८० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज लावला जात आहे. परिणामी, तिला काढून टाकण्याचा निर्णय रश्मिकाने घेतल्याचे एका सूत्राने उघड केले आहे.
वर्कफ्रंटवर रश्मिका मंदान्ना अभिनेता रणबीर कपूरसोबत अॅनिमलमध्ये दिसणार आहे. हा अॅक्शन ड्रामा चित्रपट कबीर सिंग फेम संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केला आहे आणि त्यात अनिल कपूर आणि बॉबी देओल प्रमुख भूमिकेत आहेत. अॅनिमल 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
रश्मिकाकडे पुष्पा 2 हा चित्रपटदेखील आहे. ती सध्या अल्लू अर्जुनच्या पुष्पा: द रुल, फ्रँचायझीचा सिक्वेल या चित्रपटात काम करत आहे. सुकुमार दिग्दर्शित आणि अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटात ती श्रीवल्लीची भूमिका पुन्हा साकारणार आहे.
पुष्पाचा दुसरा भाग: पुष्पा २ चित्रपट अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल यांच्यातील संघर्षावर केंद्रीत असेल. पहिल्या भागाच्या अखेरीस दोघांच्यामधील संघर्षाची ठिणगी पडली होती. हा चित्रपट मूळ तेलुगू भाषेत बनला होता व त्याचे हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये डब करुन रिलीज करण्यात आले होते.