महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Singham 3 : 'सिंघम 3'मधील रणवीर सिंगचा फर्स्ट लूक रिलीज; सोशल मीडियावर चाहत्यांनी केलं कौतुक... - रणवीर सिंगचा फर्स्ट लूक

Singham 3 : रणवीर सिंगचा 'सिंघम 3'मधील फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. या लूकमध्ये तो 'चार्ज्ड' दिसत आहे.

Singham 3
सिंघम 3

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 2:59 PM IST

मुंबई - Singham 3 :'सिंघम 3' चित्रपटातील रणवीर सिंगचं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या शेअर केलेल्या पोस्टरमध्ये रणवीर हा पोलिसांच्या गणवेशात असून तो खूप उत्साहात दिसत आहे. इंस्टाग्रामवर पोस्टर शेअर करत त्यानं कॅप्शनमध्ये लिहलं, 'सर्वात खोडकर, सर्वात अनोखा. आला रे आला सिम्बा आला'. 'सिंघम 3'मधील रणवीरचा लूक पाहून चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप आतुर झाले आहेत. त्याच्या या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, वेलकम माय सिम्बा.' दुसऱ्या चाहत्यानं लिहिलं, 'सिम्बाला भेटण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.' आणखी एकानं लिहिलं, 'हा चित्रपट खूप खास असणार आहे. रणवीर तुझा लूक खूप सुंदर आहे'. अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत. याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

'सिंघम 3' चित्रपटात दिसतील हे स्टार्स :रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या 'सिंघम 3' या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ यांच्यासह अनेक कलाकार दिसणार आहेत. त्याचबरोबर सिम्बा ( रणवीर सिंग) आणि सूर्यवंशी (अक्षय कुमार) या चित्रपटात कॅमिओ भूमिकेत दिसतील. रणवीरच्या आधी 'सिंघम 3' चित्रपटातून दीपिका पदुकोण आणि टायगर श्रॉफचे लूक समोर आले आहेत. हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज होणार आहे. 'सिंघम 3'ची टक्कर बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'शी होणार आहे.

दीपिका पदुकोणने शेअर केली पोस्ट : 'सिंघम 3' हा एक अ‍ॅक्शन चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ हे कलाकार अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. दरम्यान आता दीपिकानं सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना मोठी आनंदाची बातमी दिली आहे. दीपिकानं आज 30 ऑक्टोबर रोजी तिच्या इन्स्टा पोस्टमध्ये सांगितले की, रणवीर सिंगनं 'सिंघम 3' चित्रपटात सिम्बा म्हणून प्रवेश केला आहे. 'सिंघम' फ्रँचायझीचे चाहते अजय देवगण आणि अक्षय कुमारच्या फर्स्ट लूकची वाट पाहत आहेत.

हेही वाचा :

  1. Kali Peeli Taxi : हिंदी चित्रपटसृष्टीतील काळी पिवळी टॅक्सीवर आधारित 'या' चित्रपटांबद्दल जाणून घ्या ; टॉप सहा चित्रपट...
  2. Kiran Mane about Manoj Jarange : 'सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे जरांगे पाटीलांनी दाखवून दिलं' : किरण मानेंची पोस्ट चर्चेत
  3. Ananya Panday birthday : सुहाना खान आणि शनायानं 'बेस्टी' अनन्याला दिल्या वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा

ABOUT THE AUTHOR

...view details