मुंबई- बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणचा फ्रान्समधील कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्ये ज्युरी म्हणून समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, दीपिका सोशल मीडियावरही पूर्णपणे सक्रिय आहे. हा फिल्म फेस्टीव्हल २८ मे रोजी संपणार आहे. कार्यक्रम संपण्याच्या एक दिवस आधी दीपिका पदुकोणने कान्समधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दीपिका पदुकोण खूप मस्ती करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीचा पती आणि अभिनेता रणवीर सिंग देखील दिसला आहे.
सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये दीपिका पदुकोण तिच्यासोबत कान्समध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. त्याचवेळी या व्हिडिओमध्ये अभिनेता रणवीर सिंग दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दीपिकाची टीम तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे असे म्हणते, तर दीपिका म्हणते की इतका आवाज करणारा चिडीया पक्षी मला देऊ नका.