मुंबई : रणवीर सिंगने नुकताच त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा केला. रणवीर सिंग हा ६ जुलै रोजी ३८ वर्षांचा झाला आहे. रणवीर सिंगच्या वाढदिवसानिमित्त्याने त्याच्या चाहत्यांनी, सेलिब्रिटींनी आणि काही खास मित्रांनी त्याला शुभेच्छा दिल्या. दरम्यान रणवीरला त्याच्या वाढदिवसानिमित्त्याने अभिनेत्री पत्नी दीपिका पदुकोणकडून सोशल मीडियाद्वारे विश केल्या गेले नाही. खरंच, दीपिकाने यावर्षी पती रणवीर सिंगला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत.
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण :दरम्यान यामुळे दीपिका पदुकोणच्या चाहत्यांनीही तिला आणि रणवीरला ट्रोल करायला सुरुवात केली आणि दोघांच्या विभक्त होणार असल्याच्या बातम्या पसरू लागल्या. त्यानंतर रणवीर सिंगने दीपिकासोबतच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो ब्लॉक एन्ड व्हाईटमध्ये आहे. फोटोमध्ये दीपिका आणि रणवीर अतिशय सुंदर दिसत आहे. या फोटोत रणवीर आणि दीपिका एका जहाजात दिसत आहे, याशिवाय समुद्र असणाऱ्या जहाजामधून हे जोडपे डोकावत आहे. रणवीरने हा फोटो शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.
पोस्टमध्ये काय लिहले :रणवीर हा फोटो शेअर करत लिहिले, 'मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल माझ्या चाहत्यांचे आभार.' सेलिब्रेशननंतर रणवीर दीपिकासोबत अलिबागहून मुंबईला पोहोचला आणि त्यानंतर हे जोडपे एकत्र कारमध्ये स्पॉट झाले. रणवीरने आपला वाढदिवस दीपिकासोबत अलिबागमध्ये साजरा केल्याचे बोलले जात आहे. अनेकदा हे जोडपे एकामेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. तसेच रणवीर आणि दीपिकाचे हे फोटो सोशल मीडियावर फार जास्त व्हायरल होत आहे.
वर्कफ्रंट : रणवीर सिंगच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, त्याचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट २८ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर दीपिका ही हृतिक रोशनसोबत 'फायटर' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून वेळ आहे. 'फायटर' हा चित्रपट जानेवारी २०२५ मध्ये प्रदर्शित होऊ शकते.
हेही वाचा :
- 'OMG 2' teaser : 'ओह माय गॉड २' ची प्रतिक्षा संपली... अक्षय कुमारने जाहीर केली तारीख
- 'Jawan' Prevue Out: किंग खानने जवान सिनेमाच्या प्रिव्ह्यूची तारीख केली जाहीर; सिनेमा याच दिवशी होणार रिलीज
- Andheri se Chanderi: स्त्री २ च्या शुटसाठी श्रद्धा कपूर 'अंधेरी से चंदेरी' रवाना