महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अमिताभ बच्चन यांचा करियरवर प्रभाव असल्याचा रणवीर सिंगनं केला खुलासा - रेड सी फिल्म फेस्टिव्हल

Ranveer Singh : अभिनेता रणवीर सिंग सध्या चर्चेत आला आहे. अलीकडेच जेद्दाह येथील 'रेड सी फिल्म फेस्टिव्हल'मध्ये त्याचा गौरव करण्यात आला असून त्याच्या कारकिर्दीवर दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांचा मोठा प्रभाव असल्याचं त्यानं सांगितलं आहे.

Ranveer Singh
रणवीर सिंग

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2023, 1:11 PM IST

मुंबई - Ranveer Singh :अभिनेतारणवीर सिंगनं आपल्या जबरदस्त अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यानं चित्रपटसृष्टीत 'बँड बाजा बारात' या चित्रपटद्वारे पदार्पण केलं. तो शेवटी, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये दिसला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. आता अलीकडेच जेद्दाह येथील 'रेड सी फिल्म फेस्टिव्हल'मध्ये त्यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर त्यानं डेडलाईनसोबतच्या संभाषणात सांगितलं की, त्याच्या कारकिर्दीवर महान अमिताभ बच्चन यांचा मोठा प्रभाव असल्याचं म्हटलं. याशिवाय त्यानं प्रसिद्ध चित्रपट निर्माते मार्टिन स्कॉर्सेस यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असल्याचं सांगितलं.

रणवीर सिंगची मुलाखत : रणवीर सिंगला मुलाखतीदरम्यान अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी सांगितलं की, अलीकडेच त्यानं 'किलर्स ऑफ द फ्लॉवर मून' सिनेमात पाहिला होता. याशिवाय नुकताच चित्रपटगृहात दाखल झालेला 'नेपोलियन' हा चित्रपट पाहण्याची अपेक्षा त्यांनं व्यक्त केली. व्यतिरिक्त त्यानं मार्टिन स्कॉर्सेस यांचं खूप कौतुक यावेळी केलं. त्यानंतर रणवीर सिंगला विचारण्यात आलं की, तो अभिनेता नसता तर कुठला व्यवसाय करत असता. यावर त्यानं सांगितलं की, त्याच्या बॅकअप निवडी लेखक आणि शिक्षक या आहेत. आता नुकताचं रणवीर हा 'कॉफी विथ करण'मध्ये पत्नी दीपिका पदुकोणसोबत दिसला होता. हा एपिसोड खूप चर्चेत होता.

रणवीर सिंगचा वर्क फ्रंट : रणवीर शेवटी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये रॉकी रंधवाच्या भूमिकेत दिसला होता. आता तो संजय लीला भन्साळीच्या 'बैजू बावरा'मध्ये आलिया भट्टसोबत काम करणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय तो रोहित शेट्टीच्या 'सिंघम 3'मध्ये दिसणार आहे, ज्यात त्याच्यासोबत अजय देवगण, दीपिका पदुकोण, अक्षय कुमार, करीना कपूर खान आणि टायगर श्रॉफ यासारख्या कलाकार दिसणार आहेत. याव्यतिरिक्त, तो फरहान अख्तरच्या 'डॉन 3'मध्ये झळकणार आहे. या चित्रपटासाठी रणवीरचे चाहते खूप आतुरतेनं वाट पाहत आहेत. याव्यतिरिक्त 'डॉन 3'मध्ये त्याच्यासोबत प्रियांका चोप्रा देखील दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. प्रभासच्या सालारचा ट्रेलर रिलीज, उत्कंठा वाढवणाऱ्या दृष्यांनी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
  2. 'भाजपाकडून निवडणूक लढवणार' बातमीचं कंगना रणौतनं केलं खंडन
  3. 'डंकी ड्रॉप 3' मध्ये हृदयस्पर्शी 'निकले थे कभी हम घर से' गाणं लॉन्च

ABOUT THE AUTHOR

...view details