महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Ranveer Singh troll : रणवीर सिंगने उचलला कचरा; नेटिझन्स म्हणतात, 'ओव्हर अ‍ॅक्टींगचे ५० रुपये कट' - रणवीरवर ट्रोलर्सची टोळी

एका इव्हेंटमध्ये रणवीर सिंग जमिनीवरून काही कचरा उचलताना दिसला. हा व्हिडिओ ऑनलाइन समोर आल्यानंतर, अनेकांनी हा पब्लिसिटी स्टंट असल्यांचे म्हणत टीका केली. काहींनी किंवा दीपिकाच्या तो किती धाकात असल्याचे म्हटले तर काहींनी त्याला स्वच्छतेचे वेड असल्याचे सांगितले.

रणवीर सिंगने उचलला कचरा
रणवीर सिंगने उचलला कचरा

By

Published : Mar 21, 2023, 4:19 PM IST

मुंबई - रणवीर सिंगने सोमवारी सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट दर्शन येवलेकर यांच्या सलूनचे उद्घाटन केले. अभिनेता रणवीर आनंदी मूडमध्ये होता आणि सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ यांच्याशी विनोद करताना तो फ्लोअरवरील कचरा उचलताना दिसला. मात्र त्याचा हा कचरा उचलण्याचा प्रकार काहींना पटला नाही आणि त्याची प्रसिद्धी स्टंट म्हणून हेटाळणी करायला सुरुवात केली. इतरांनी सांगितले की त्याची अभिनेत्री-पत्नी दीपिका पदुकोण ही नेहमी तिच्या स्वच्छतेच्या वेडाबद्दल बोलते, त्याचाच रणवीरवर प्रभाव पडला आहे.

रणवीर या कार्यक्रमात साधा काळा टी-शर्ट, राखाडी डेनिम जीन्स आणि काळे शूज घालून दिसला आणि त्याचे केस पोनीटेलमध्ये बांधले होते. एका ठिकाणी भिंतीजवळून जाताना त्याला काही लहान गोष्टी दिसल्या आणि तो त्या उचलताना दिसला. एका पापाराझोने ते रेकॉर्ड केले आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला ज्यात त्याने लिहिले आहे, रणवीर सिंगला कचरा आवडत नाही. बऱ्याच जणांनी या कॅप्शनची थट्ट करायला सुरुवात केली. एकाने लिहिले की,' कॅमेरा के सामने... लिखना भूल गए कॅप्शन में', तर दुसऱ्याने लिहिले, 'असे दिसते की तो या क्षणाचा आनंद घेण्यासाठी आला होता आणि सुदैवाने काही कागदाच्या तुकड्यांनी त्याला मदत केली' , कचरा पसंद नहीं है तो शहर में बहोत कचरा है वो साफ किया क्या, फिर ये क्या ओव्हरअ‍ॅक्टिंग कर रहा है. ओव्हर अ‍ॅक्टींगचे ५० रुपये कट, अशी जळजळीत टीकाही एकाने केली.

अशा प्रकारे रणवीरवर ट्रोलर्सची टोळी आघात करत आहे. सेलेब्रिटींचे कुठलेली वागणे याला एक तर लाईक केले जाते किंवा ट्रोल केले जाते. आजकाल सुरू असलेला हा ट्रेंड कुठल्या दिशेने जातोय हेच कळत नाही. खूप नकारात्मकता सोशल मीडियावर फैलावली जात आहे हेच खरे. रणवीर सिंगच्या आगामी चित्रपटांचा विचार करता तो आणि आलिया भट्ट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट आता जुलै महिन्याच्या २८तारखेला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे रिलीज ३ महिन्यांनी पुढे ढकलण्यात आले आहे. पूर्वी हा चित्रपट एप्रिलमध्ये रिलीज केला जाणार होता. दिग्दर्शनाकडे परतणारा बॉलीवूड निर्माता करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हेही वाचा -School, College And Life : स्कुल, कॉलेज आणि लाईफ चित्रपटाच्या ट्रेलरमुळे प्रेक्षक जुन्या आठवणीत रमले

ABOUT THE AUTHOR

...view details