मुंबई - Sandeep Reddy Vanga: दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा त्यांच्या आगामी 'अॅनिमल' चित्रपटामुळं चर्चेत आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि अनिल कपूर, तृप्ती डिमरी, परिणीती चोप्रा, सौरभ शुक्ला आणि इतर कलाकार दिसणार आहे. या चित्रपटामध्ये बॉबी देओल हा खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. आता 'अनिमल' या चित्रपटाचे दिग्दर्शक आपल्या टीमसोबत चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. यादरम्यान त्यानी त्याच्या याआधीच्या हिट चित्रपट 'कबीर सिंग'बद्दल मोठा खुलासा केला आहे.
रणवीर सिंगनं 'कबीर सिंग' चित्रपट नाकारला : एका मुलाखतीत त्यांनी आपल्या चित्रपटांचे पुन्हा कधीही रिमेक बनवणार नसल्याचं म्हटलं होतं. यामागील कारण सांगताना त्यांनी म्हटलं होतं की, 'अर्जुन रेड्डी' या त्याच्या तेलुगू हिट चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवताना त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला. 'कबीर सिंग' या चित्रपटात शाहिद कपूरला कास्ट करायचं नसल्याचं संदीपनं यावेळी सांगितलं आणि कबीर सिंगसाठी त्याची पहिली पसंती रणवीर सिंग होता असंही त्यांनी म्हटलं होत. पुढं त्यानं म्हटलं, रणवीरनं या भूमिकेमुळं आपली प्रतिमा डागाळणार असल्याचं सांगत ही ऑफर नाकारली होती.