महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Ranveer Singh hilarious video : पाहा रणवीर सिंगचे 'तुम क्या मिले' गाण्यावर धमाल रील, आलियासह चाहतेही फिदा - आलिया भट्ट

रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटातील तुम क्या मिले प्रेक्षकांच्या पसंतील उतरलंय. या गाण्यावर रणवीर सिंगने एक मजेशीर रील बनवले असून आलियासह अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिलेत.

Ranveer Singh hilarious video
रणवीर सिंगचे 'तुम क्या मिले' गाण्यावर धमाल रील

By

Published : Jul 1, 2023, 7:50 PM IST

मुंबई - रॉकी और रानी की प्रेम कहानी या आगामी चित्रपटाबद्दलची चर्चा सध्या जोरात आहे. अलिकडेच याचा टीझर रिलीज झाल्यानंतर त्यातील भव्यता आणि झगमगाट प्रेक्षकांना आवडला. त्यानंतर आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्यावर चित्रीत झालेले तुम क्या मिले हे गाणेही रिलीज करण्यात आले. अरिजीत सिंगचा मधुर आवाज, प्रीतमचे संगीत आणि अमिताभ भट्टाचार्य यांचे शब्दरचना असलेले हे गीत आता प्रेक्षकांच्या ओठावर आणि जिभेवर रुळायला सुरूवात झाली आहे. दरम्यान या गाण्याचे आलियाने रील बनवले असून याचीही आता नव्याने चर्चा सुरू झालीय.

आलिया भट्टने तिच्या आगामी रोमँटिक चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मधील 'तुम क्या मिले' गाण्याच्या व्हिडिओद्वारे चाहत्यांना ट्रीट केल्यानंतर, अभिनेता रणवीर सिंगने एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट केला आहे. इंस्टाग्रामवर रणवीरने चाहत्यांना एका नवीन रीलसह ट्रीट केले आणि आलियालाही थोडेसे चिडवण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये रणवीर सिंगने लिहिलंय, 'बजेट आलियाच्या रीलइतके नव्हते.' रणवीर सिंग ब्राऊन रंगाच्या शर्टमध्ये दिसत असून त्याने तु जो मिले या गाण्याचा आनंद लुटलाय. याला प्रतिक्रिया देताना आलियाने कमेंटमध्ये लिजेंड असे लिहिलंय.

रणवीरच्या या व्हिडिओवर भरपूर प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी हे गीत आवडलंय. रणवीरचे चाहते आणि इंडस्ट्रीतील मित्रांनी देखील टिप्पण्या विभागात जोरदार चर्चा केली. अभिनेत्री नुपूर सेनन आणि त्रिशा कृष्णन यांनी हसणाऱ्या इमोजीसह प्रतिक्रिया दिलीय. तर एका चाहत्याने लिहिले, 'द्वेष करणारे म्हणतील की, हा आता हिरवी पडदा आहे'. दुसर्‍याने कमेंट केली, 'ब्रह्मास्त्र आणि आदिपुरुष एकत्र करण्यापेक्षा हे चांगले आहे'.

रॉकी और रानी की प्रेम कहानी या रोमँटिक चित्रपटाच्या निर्मात्यांनी बुधवारी तुम क्या मिले या बहुप्रतिक्षित ट्रॅकचे अनावरण केले होते. या चित्रपटाद्वारे करण अर्जुन पुन्हा अकदा दिग्दर्शन करण्यासाठी सज्ज झालाय. या चित्रपटातील तुम क्या मिले हे गाणे अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांनी गायले आहे. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर, आलिया, जया बच्चन, धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details