मुंबई - गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील ढोलिडा या गाण्यावर प्रेक्षक फिदा झाल्याचे पाहायला मिळाले. या गाण्याचा मेकिंग व्हिडिओ आज रिलीज करण्यात आला. हे गाणे शूट करणे सोपे नव्हते. यासाठी आलिया भट्टने प्रचंड मेहनत घेतल्याचे व्हिडिओत पाहायला मिळते. विशेष म्हणजे या गाण्याच्या शुटिंग प्रसंगी रणवीर सिंग हजर होता. त्यानेही आलियासोबत ठुमके लावल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे.
ढोलिडा या गाण्याच्या शुटिंगदरम्यान रणवीर सिंगने गंगूबाई काठियावाडीमधील ढोलिडा गाण्यावर आलिया भट्टसोबत जबरदस्त थिरकला. गली बॉयमध्ये आलियासोबत काम केलेला रणवीर सिंग गंगूबाई सेटवर अवतरला होता. यावेळी त्याने आलियाचे कौतुक तर केलेच पण तिच्यासोबत नाचण्याची संधीही सोडली नाही.