मुंबई - Animal Teaser: रणबीर कपूरचा 'अॅनिमल' हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटामध्ये रणबीरचा वेगळा लूक चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. 'अॅनिमल' चित्रपटाची घोषणा जेव्हापासून झाली, तेव्हापासून चाहते या चित्रपटाच्या टीझरची वाट पाहत आहेत. दरम्यान आता निर्मात्यांनी या प्रतिक्षेला पूर्णविराम दिला असून चित्रपटाच्या टीझर रिलीजची तारीख निश्चित केली आहे. याशिवाय या चित्रपटामधील रणबीर कपूरचा नवा लूकही समोर आला आहे. 'अॅनिमल' चित्रपटामध्ये रणबीर कपूर पहिल्यांदाच साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
'अॅनिमल'ची टीझर डेट आली समोर : टीझर रिलीज डेटसोबतच रणबीर कपूरचा नवा लूक समोर आल्यानंतर चाहते त्याचं कौतुक करत आहेत. या लूकमध्ये तो गॉगल घालून सिगारेट ओढताना दिसत आहे. टीझरची तारीख आणि नवीन लूक समोर आल्यानंतर चाहत्यांनी उत्सुकता दाखवली आहे. रणबीरच्या एका चाहत्यानी पोस्टवर कमेंट करत लिहलं, '28 सप्टेंबरला धमाका करणारा टीझर.' दुसऱ्या एका चाहत्यानं कमेंट करत लिहलं 'मला या चित्रपटाबद्दल इतका विश्वास आहे की, जर हा चित्रपट चांगला चालला नाही तर मी चित्रपट पाहणं बंद करेन.' अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत. रणबीरच्या 'अॅनिमल' चित्रपटाचा टीझर त्याच्या वाढदिवसाला म्हणजेच 28 सप्टेंबरला 10 वाजता रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.