महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Rani mukerji Birthday : ९०च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री - राणी मुखर्जी; जाणून घ्या मर्दानीच्या या खास गोष्टी - Rani mukerji news

राणी मुखर्जी आज 21 मार्च रोजी तिचा 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिने तिच्या अभिनयाच्या प्रवासात खूप मेहनत घेतली आहे. जाणून घेऊया बॉलिवूडच्या 'मर्दानी'बद्दल काही न ऐकलेल्या गोष्टी.

Rani mukerji Birthday
९०च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री - राणी मुखर्जी

By

Published : Mar 21, 2023, 10:44 AM IST

हैदराबाद : बॉलिवूडची 'मर्दानी' राणी मुखर्जी ९० च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्रींपैकी एक आहे. सौंदर्यातही राणी कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. राणी मुखर्जी अभिनयाच्या बाबतीत ९० च्या दशकातील अभिनेत्रींपेक्षा पुढे आहे. यामुळेच तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर चार वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे. आज राणी मुखर्जी तिचा 45 वा वाढदिवस साजरा करत आहे.

असे केले अभिनयात पदार्पण :राणीने तिचे चित्रपट दिग्दर्शक वडील राम मुखर्जी दिग्दर्शित बंगाली चित्रपट 'बियार फूल' (1996) मधून अभिनय पदार्पण केले. 'राजा की आयेगी बारात' (1997) या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. राणी मुखर्जीचा जन्म 21 मार्च 1978 रोजी मायानगरी मुंबईत चित्रपट जगताशी निगडित कुटुंबात झाला. राणीचे वडील राम मुखर्जी चित्रपट दिग्दर्शक होते, आई कृष्णा मुखर्जी पार्श्वगायिका होत्या. राणीचा भाऊ राजा हा देखील निर्माता आणि दिग्दर्शक आहे.

या भूमिकेतून केले स्वत:ला सिद्ध : बॉलिवूडच्या हिट अभिनेत्रींपैकी एक असलेली काजोल आणि 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी तिचे चुलत भाऊ बहीण आहेत. 1996 मध्ये राणीने तिच्या आईच्या सांगण्यावरून चित्रपटांमध्ये पाऊल ठेवले होते. राजा की आयेगी बारात या चित्रपटानंतर राणी आमिर खान स्टारर आणि विक्रम भट्ट दिग्दर्शित 'गुलाम' (1998) या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यानंतर करण जोहरच्या गँगमध्ये राणी मुखर्जीची एन्ट्री झाली. जेव्हा करण जोहरच्या क्रश ट्विंकल खन्नाने कुछ कुछ होता है (1998) या चित्रपटातील टीना मल्होत्राची भूमिका नाकारली तेव्हा हिट भूमिका राणीकडे गेली. राणीने या भूमिकेत स्वत:ला सिद्ध केले आणि ती बॉलिवूडमध्ये प्रस्थापित झाली.

अभिनेत्रीने खूप मेहनत केली :राणीबद्दल असे म्हटले जाते की, तिचा आवाज चांगला नव्हता. पण अभिनेत्रीने खूप मेहनत केली आणि तिच्या आवाजावर मेहनत घेतली. राणी मुखर्जीचा सलमान खानसोबतचा पहिला चित्रपट 'हॅलो ब्रदर' (1999) हा फ्लॉप ठरला. यानंतर 2000 मध्ये, राणीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले जे बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले, ज्यात बादल, बिछू, हे राम आणि हर दिल जो प्यार करेगा यांचा समावेश होता. lतर 2001 मध्ये राणी मुखर्जी सलमान खानसोबत चोरी चोरी चुपके चुपके, अभिषेकसोबत बस इतना सा ख्वाब है, अनिल कपूरसोबत नायक – द रिअल हिरो या चित्रपटात दिसली होती.

हेही वाचा :Teaser of Maharashtra Shaheer : मराठमोळ्या शाहिरी गाण्यांची पर्वणी असलेला महाराष्ट्र शाहीरचा टिझर रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details