महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Alia Bhatt on Holi : रंगीली राणी आलिया भट्टने काश्मीरमधील शुटिंग सेटवरुन दिल्या होळीच्या शुभेच्छा - काश्मीरमध्ये शुटिंगमध्ये बिझी

काश्मीरमध्ये शुटिंगमध्ये बिझी असलेल्या आलिया भट्टने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना सणाच्या शुभेच्छा दिल्या. तिच्या आगामी रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाच्या काश्मीर शेड्यूलमधील फोटोसह आलियाने तिच्या चाहत्यांना ट्रीट दिली.

रंगीली राणी आलिया भट्ट
रंगीली राणी आलिया भट्ट

By

Published : Mar 7, 2023, 5:35 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या आगामी रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये काश्मीरमध्ये व्यग्र आहे. रणबीर कपूरसोबत लग्न केल्यानंतर आणि त्यांची मुलगी राहा हिचे स्वागत केल्यानंतर पहिली होळी साजरी करण्यासाठी ती सासरपासून दूरच्या टिकाणी गेली आहे. असे असले तरी आलिया मात्र तिच्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा द्यायला चुकली नाही.

आलिया भट्टची होळी सणाच्या निमित्ताने तिच्या लेटेस्ट पोस्टमध्ये या सणाची भावना स्पष्टपणे दिसून येते. तिच्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी, आलियाने इंस्टाग्रामवर रॉकी और रानी की प्रेम कहानी शूटमधील एक फोटो शेअर केला आहे. यात आलियाने चमकदार गुलाबी साडी घातली आहे जी तिने हिरव्या स्लीव्हलेस ब्लाउजसह जोडली आहे.

चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देताना आलियाने लिहिले, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी च्या सेटवरुन रिपोर्ट करत असलेल्या एका रंगीली राणीकडून होळीच्या शुभेच्छा.' आलियाच्या होळीच्या पोस्टने चाहत्यांना भुरळ पडली आहे. कारण ती हातात रंगीबेरंगी छत्री धरून फोटोत आश्चर्यकारक दिसत आहे. अभिनेत्री आलियाला सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सकडून सणाच्या शुभेच्छा देखील मिळाल्या.

आलिया भट्ट ही आपल्या कामाप्रती नेहमी संवेदनशील असते. आपल्यामुळे निर्मात्याचे नुकसान होऊ नये यासाठी ती मेहनत घेत असते. गंगुबाई काठियावाडी चित्रपटाच्यावेळी तिने अशीच मेहनत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासाठी केली होती. आपण त्याचा परिणामही पाहिला की, ती या चित्रपटात खूप उठून दिसली होती आणि तिच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा झाली होती.

आलिया आरआरकेपीकेच्या शूटिंगसाठी काश्मीरला रवाना झाली तेव्हा तिची मुलगी राहा तिच्यासोबत गेली होती. काही दिवसानंतर 4 महिन्यांची मुलगी मात्र मुंबईला परतली कारण रणबीर तिला केअरटेकरसोबत विमानतळावरून उचलताना दिसला. करण जोहर दिग्दर्शित चित्रपटाच्या शेवटच्या गाण्याचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर आलिया रणबीर आणि राहासोबत पुन्हा एकत्र येणार आहेत. आलिया शिवाय रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामध्ये रणवीर सिंग, धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी देखील मुख्य भूमिकेत आहेत.

हेही वाचा - Sonakshi Sinha Shares Holi Picture : सोनाक्षी सिन्हाने होळीचा फोटो शेअर करताच कथित बॉयफ्रेंड झहीरने केले ट्रोल

ABOUT THE AUTHOR

...view details