महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

रणदीप हुडा पत्नी लिन लैशरामसह नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी केरळला झाला रवाना - रणदीप हुडा आणि लिन लैशराम

Randeep Hooda and Lin Laishram :अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्याची पत्नी लिन लैशराम हे आज मुंबई विमानतळावर दिसले. त्याचा एअरपोर्टवरील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Randeep Hooda and Lin Laishram
रणदीप हुड्डा आणि लिन लैशराम

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 30, 2023, 2:46 PM IST

मुंबई - Randeep Hooda and Lin Laishram : अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्याची पत्नी लिन लैशराम त्याच्या लग्नामुळं सध्या चर्चेत आहे. या जोडप्याचं लग्न 29 नोव्हेंबर रोजी झालं. यानंतर या दोघांनी मुंबईत लग्नाचे रिसेप्शनही दिलं. यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या जोडप्याचा विवाह मणिपूर येथील इम्फाळमध्ये मेईतेई पद्धतीनं पार पडला. रणदीप आणि लिनच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. दरम्यान हे कपल मुंबई एअरपोर्टवर आज म्हणजेचं 30 डिसेंबर रोजी स्पॉट झाले. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या निमित्तानं हे जोडपे त्यांचा हनिमून साजरा करण्यासाठी एका सुंदर ठिकाणी जात आहेत.

लिन आणि रणदीपचा झाले एअरपोर्टवर स्पॉट : या जोडप्याचे मुंबई एअरपोर्टवरील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये रणदीप ग्रे पँटसोबत क्रीम शर्टमध्ये दिसत आहे. यावर त्यानं सनग्लास लावला आहे. या लूकमध्ये तो खूप देखणा दिसत आहे. याशिवाय लिन पांढऱ्या प्लाझो आणि क्रॉप टॉपसह पिस्ता रंगाच्या शर्टमध्ये स्पॉट झाली. या लूकवर तिनं लाईट मेकअप केला होता. याशिवाय तिच्या हातात एक बॅग होती. या लूकमध्ये ती सुंदर दिसत आहे. व्हिडिओत रणदीपनं लिनसाठी कारचं डोअर उघडला आणि हे जोडपे एअरपोर्टच्या दिशेला गेले. एअरपोर्टवर लिन आणि रणदीप यांच्यात एक अतिशय सुंदर क्षणही पाहायला मिळाला.

रणदीप आणि लिनचा व्हिडिओ व्हायरल : दरम्यान या व्हिडिओवर अनेकजन कमेंट्स करत आहेत. या व्हिडिओवर एका चाहत्यानं कमेंट करत लिहिलं,'' या जोडप्याची जोडी खूप सुंदर दिसत आहे''. दुसऱ्या चाहत्यानं लिहिलं, ''एकत्र खूप सुंदर दिसत आहेत''. आणखी एकानं लिहिलं, ''या दोघांच लग्न खूप सुंदर होतं''. अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत. याशिवाय काहीजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. रणदीप लिनसोबत केरळमध्ये नवीन वर्ष साजरे करणार असल्याचं बोललं जात आहे. लग्नाआधी या जोडप्यानं त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांच्या लग्नाची तारीखही उघड केली होती.

हेही वाचा :

  1. नवविवाहित अरबाज खान आणि शशूरा खान नव्या वर्षाच्या स्वागतासाठी विमानाने रवाना
  2. 'डंकी' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा टप्पा केला पार
  3. दिग्दर्शक मारुतीच्या चित्रपटात नव्या अवतारात झळकणार अभिनेता प्रभास

ABOUT THE AUTHOR

...view details