मुंबई Randeep hooda wedding :अभिनेता रणदीप हुड्डानं त्याची मणिपुरी गर्लफ्रेंड लिन लैशराम हिच्याशी 29 नोव्हेंबर रोजी मेईतेई पद्धतीनं इम्फाळमध्ये लग्न केलं. या नवविवाहित जोडप्यानं त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान अनेकजण त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. मात्र काहीजण रणदीप हुड्डाला इंटरकास्ट मॅरेज केल्यामुळं प्रचंड ट्रोल करत आहेत. रणदीप हुड्डानं एकदा सांगितलं होतं की, 'आमच्या घरातून कोणीही नॉन जाटसोबत लग्न केलं नाही' आता युजर्सनं त्याला जातीबाहेर लग्न केल्याबद्दल फटकारलं आहे.
रणदीप हुड्डा झाला ट्रोल :रणदीप हुड्डानं लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या जोडप्यानं लग्नाचे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आजपासून आम्ही एक आहोत', या फोटोवर अनेकजण कमेंट करुन त्याला ट्रोल करत आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, 'ही तीच व्यक्ती आहे ज्यानं एका मुलाखतीत म्हटलं होतं की, आमच्या घरातील कोणीही नॉन - जाट झालेलं नाही, आता काय झालं भाऊ, तू तुझं स्टेटस दाखवलं आहेस'. दुसऱ्या एकानं लिहिलं, 'हा अभिनेता एका व्हिडिओमध्ये म्हणत होता की, नॉन-जाटशी लग्न करू नका आणि त्यानं स्वत: नॉन-जाटशी लग्न केलं. आणखी एकानं लिहिलं, 'जाट असलेल्या भावानं नॉन-जाटशी लग्न करुन आपला दर्जा दाखवला.' याशिवाय एकानं यूजरनं लिहिलं, 'जो त्याच्या शब्दाचा नाही, तो जाटांचा नाही',अशा अनेक कमेंट त्याच्या पोस्टवर सध्या येत आहेत.