मुंबई - Randeep Hooda Lin Laishram Wedding : अभिनेता रणदीप हुड्डा आज गर्लफ्रेंड लिन लैश्रामसोबत लग्नगाठ बांधणार आहे. या जोडप्याचं लग्न आज मणिपूरमधील इम्फाळ येथे होणार आहे. दरम्यान, रणदीपच्या होणाऱ्या पत्नीनं तिच्या इंस्टाग्रामवर काल झालेल्या तिच्या प्री-वेडिंग फंक्शनचे काही फोटो शेअर केले आहेत. प्री-वेडिंग फंक्शनच्या फोटोंमध्ये हे जोडपे त्यांच्या मित्र आणि कुटुंबासह एन्जॉय करताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये रणदीप हा खूप आनंदी दिसत आहे. पहिल्या फोटोमध्ये लिननं लाल रंगाची पारंपारिक शाल परिधान करून मित्रांसोबत फोटोसाठी पोझ दिली आहे. दुसऱ्या फोटोमध्ये रणदीप नाचताना दिसत आहे.
रणदीप हुडाचं लग्न : रणदीपनं फोटोमध्ये ऑफ व्हाइट शर्टसह फिकट निळ्या रंगाचा पॅन्ट घातला आहे. दुसरीकडे लिननं फोटोत पोपटी रंगाच्या कॉटन साडी परिधान केली आहे. यामध्ये ती सुंदर दिसत आहे. तिसरा फोटो जेवणाच्या टेबलाचे आहे. या फोटोमध्ये या जोडप्याच्या कुटुंबातील सदस्य जेवण करताना दिसत आहे. रणदीप आणि लिन हे 27 नोव्हेंबरला लग्नासाठी इम्फाळला पोहोचले होते. या जोडप्यानं प्रथम मंदिरात जाऊन पूजा केली होती. यानंतर त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली होते. रणदीपनं नुकतेच इंस्टाग्रामवर त्यांच्या लग्नाचे कार्ड शेअर केले होते. या कार्डच्या निवेदनात त्यानं लिहिलं होतं की, 'महाभारतापासून प्रेरणा घेऊन अर्जुननं मणिपुरी योद्धा राजकुमारी चित्रांगदाशी लग्न केले, आम्ही आमच्या कुटुंबाच्या आणि मित्रांच्या आशीर्वादानं लग्न करत आहोत. आम्ही खूप आनंदी आहोत. आमचा विवाह 29 नोव्हेंबर 2023 रोजी इम्फाळ, मणिपूर येथे होणार आहे, त्यानंतर मुंबईत रिसेप्शन होईल.आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे.'