मुंबई - Randeep Hooda Lin Laishram Wedding:अभिनेता रणदीप हुड्डा विवाहबंधनात अडकला आहे. इम्फाळमध्ये त्यांनं लिन लैश्रामशी लग्न केले. या लग्नात त्यानं पांढरी धोती कुर्ता सोबत एक विशेष प्रकारचा पगडी घातली होती. रणदीपनं घातलेल्या खास पगडीला मणिपुरी भाषेत 'कोक्यात' म्हणतात. श्वेत रंगाच्या कापडापासून बनवलेल्या पारंपरिक पगडीवर विस्तीर्ण सोनेरी रंगाची गोटपट्टी लावलेली असते. मणिपुरी विवाहसोहळ्यात या पगडीला विशेष महत्त्व असतं. विवाह विधीसाठी वधू लिन लैश्रामनं पोटलोई ड्रेस निवडला. हा सिलेंडरच्या आकाराचा स्कर्ट आहे, जो बांबू आणि जाड कापडापासून बनलेला असतो.
रणदीप हुड्डानं शेअर केली फोटो :या लग्नामधील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लिन लैश्राम आणि रणदीप एकमेकांना पुष्पहार घालताना दिसत आहेत. रणदीप हुडा आणि लिन लैश्राम यांनी इम्फाळमध्ये पारंपारिक मेईतेई पद्धतीनं लग्न केले. रणदीप हुड्डा आणि लिन लैश्राम यांनी बुधवारी 'इन्स्टाग्राम'वर त्यांच्या प्री वेडिंगमधील फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले होते. आता त्यांनी कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत मणिपुरमधील एका रिसॉर्टमध्ये सप्तपदी केली. या जोडप्यानं लग्नाचे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आजपासून आम्ही एक आहोत.' त्याने पोस्ट केलेल्या या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.