महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Ranbir Alia wedding : रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड दीपिका आणि कॅटरिनाने भरभरुन दिल्या लग्नाच्या शुभेच्छा - आलियाशी लग्न केल्याबद्दल दीपिकाच्या शुभेच्छा

रणबीर कपूर आणि आलिया भट आता अधिकृतपणे विवाहबद्ध झाल्यामुळे वर्षातील बहुप्रतिक्षित लग्न अखेर पार पडले. या जोडप्याने त्यांच्या लग्नाची घोषणा केल्यानंतर लगेचच त्यांचे मित्र, कुटुंब आणि चाहत्यांकडून अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. आलियासोबत जीवनप्रवास करण्यासाठी रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड दीपिका पदुकोण आणि कॅटरिना कैफ यांनीही त्याला शुभेच्छा दिल्या.

deepika wishes ranbir on wedding with alia
आलियाशी लग्न केल्याबद्दल दीपिकाच्या शुभेच्छा

By

Published : Apr 15, 2022, 12:06 PM IST

मुंबई - रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आता पती-पत्नी बनले आहेत आणि त्यांच्यावर शुभेच्छा संदेशांचा वर्षाव होत आहे. पण अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि कॅटरिना कैफ यांनी दिलेल्या शुभेच्छांनी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. यापूर्वी रणबीरला डेट केलेल्या दोन्ही अभिनेत्रींनी इन्स्टाग्रामवरुन नवविवाहित जोडप्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

आलियाशी लग्न केल्याबद्दल कॅटरिनाच्या शुभेच्छा

रणबीर आणि आलियाचा लग्नाचा एक सुंदर फोटो शेअर करत कॅटरिनाने लिहिले, "तुम्हा दोघांचे अभिनंदन - सर्व प्रेम आणि आनंद." तिने तिच्या पोस्टवर रेड हार्ट इमोजीची स्ट्रिंगही जोडली. दीपिकाने आलियाच्या लग्नाच्या पोस्टवर कमेंट करून या जोडप्याला शुभेच्छा देणे पसंत केले. "तुम्हा दोघांना आयुष्यभर प्रेम, प्रकाश आणि हशा लाभो," अशी तिने कमेंट केली.

आलियाशी लग्न केल्याबद्दल दीपिकाच्या शुभेच्छा

दोन्ही अभिनेत्रींनी रणबीर आणि आलियाला शुभेच्छा दिल्या हे चाहत्यांना खूप आवडले. "खरी मॅच्युरिटी अशी दिसते," असे एका युजरने यावर प्रतिक्रिया दिली. तर कॅटरिना आणि दीपिकाच्या उदारतेवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या.

रणबीर आणि आलियाने गुरुवारी वांद्रे येथील वास्तू या निवासस्थानी लग्नगाठ बांधली. दोघांनी जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत सात फेरे घेतले. यावेळी नीतू कपूर, करीना कपूर, महेश भट्ट, सोनी राजदान, करिश्मा कपूर, करण जोहर, अयान मुखर्जी आणि इतर उपस्थित होते.

हेही वाचा -Alia Ranbir Wedding Photos : पाहा, आलिया रणबीरच्या लग्नसोहळ्याची खास क्षणचित्रे

ABOUT THE AUTHOR

...view details