मुंबई - प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या पत्नी निर्माती-गायिका पमेला चोप्रा यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करण्यासाठी बॉलीवूडचे जोडपे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आदित्य चोप्राच्या निवासस्थानी पोहोचले होते. रणबीर आणि आलिया, चोप्रांच्या भेटीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर फिरत आहे.
रणबीर आलिया व्हायरल व्हिडिओ - इंटरनेटवर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये, रणबीर आलियाच्या मागे फिरताना आणि घराच्या दाराबाहेर तिच्या सँडल उचलताना दिसत आहे. त्यानंतर तो सँडल आत एका कोपऱ्यात ठेवताना दिसला. त्याच्या चाहत्यांनी त्याच्या गोड कृतीची प्रशंसा व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये केली आहे.
रणबीरच्या कृतीचे चाहत्यांना कौतुक - एका चाहत्याने कमेंट केली, 'रणबीर, तुझी ही कृती मला भावली, तुझ्यावर प्रेम आणि माझे आशीर्वाद सदैव आहेत.' दुसऱ्याने लिहिले की, 'या जोडप्याबद्दल आदर आहे. निकटवर्तीयांच्या दुःखद प्रसंगी तो नेहमी हजर असतो'. आणखी एक म्हणाला की, 'भारतातील सुंदर जोडपे, नो पीआर ना ड्रामा ना ओव्हर अॅक्टिंग दॅट्स रणबीर कपूर.' बॉलिवूडमध्ये ग्लॅमरच्या नावाखाली अनेक गोष्टी चालतात. पण आपल्या प्रिय व्यक्तीसाठी एखादे काम करणे कमी दर्जाचे समजणे नेहमीच चुकीचे आहे. अलिकडेच एका इव्हेन्ट दरम्यान ह्रतिक रोशनने प्रेयसी सबा आझादचे सँडल हातात घेतल्याचे फोटो व्हायरल झाले होते.त्याही वेळा चाहत्यांनी त्याचे कौतुकच केले होते.
आदित्या चोप्राच्या सांत्वनासाठी बॉलिवूडकरांची रीघ - रणबीर आणि आलिया यांच्या शिवाय सैफ अली खान, करीना कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्यासह अनेक बॉलिवूड स्टार्स देखील पमेला चोप्राच्या निधनानंतर शोक व्यक्त करण्यासाठी आदित्य चोप्राच्या घरी सांत्वनासाठी पोहोचले होते. पमेला यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी मुंबईतील लीलावती रूग्णालयात निधन झाले, जिथे गेल्या काही दिवसांपासून त्या वयाशी संबंधित समस्यांवर उपचार घेत होत्या. त्या एक भारतीय पार्श्वगायिका होती, त्यांनी पती यश चोप्रा यांच्यासाठी, कभी कभी ते मुझसे दोस्ती करोगे पर्यंत अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली होती! त्या शेवटची नेटफ्लिक्सच्या द रोमॅंटिक्स डॉक्युमेंटरीमध्ये दिसल्या होत्या, ज्यामध्ये त्यांनी पतीच्या दिग्दर्शक म्हणून प्रवासाची चर्चा केली होती.
हेही वाचा -Amitabh Bachchan Tweet On Elon Musk : बीग बींच्या मजेदार ट्विटनंतर एलन मस्कनी घेतली माघार, बीग बी म्हणाले तू चीज बडी है 'मस्क मस्क'