मुंबई -रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या आठवड्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. घरच्यांनी लग्नाची तारीख जाहीर केली नसली तरी आलिया आणि रणबीरच्या घरी लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. दोघांच्या लग्नाचा पोशाखही तयार झाला आहे. आता बातम्या येत आहेत की रणबीर कपूरने बूट चोरणाऱ्या मेव्हणींसाठी आपल्या लग्नाच्या बजेटमध्ये खास तरतूद केली आहे. रणवीर कपूर शूज चोरण्याच्या समारंभात त्याच्या भावी मेव्हणींना मोठी रक्कम देऊ शकतो. चपला चोरीचा सोहळा करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
बूट चोरणाऱ्या मेव्हणींसाठी रणबीरचे बजेट -मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूरने बूट चोरणाऱ्या मेव्हणींसाठी लग्नाच्या बजेटमध्ये वेगळी रक्कम राखीव ठेवली आहे. भारतीय विवाहसोहळ्यांमध्ये शूज चोरण्याचा विधी अजूनही चालू आहे. रणबीर कपूरने चपला चोरल्याच्या बदल्यात मेव्हणींना एक लाख रुपये देण्याचे बजेट तयार केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलियाची गर्ल गँग जीजू रणबीर कपूरचे बूट चोरणार आहे.
एकीकडे लग्नाचे फंक्शन चार दिवस चालणार असल्याचं बोललं जात आहे, तर दुसरीकडे आलिया-रणबीरच्या लग्नाच्या संगीत सोहळ्यासाठी कोणताही कार्यक्रम ठेवण्यात आला नसल्याचं वृत्त आहे. मात्र मेहंदी आणि हळदी समारंभ यावर भर देण्यात आल्याचे समजते.
आलिया भट्टची नणंद रिद्धिमा कपूर माहेरी दाखल -आलिया भट्टची नणंद रिद्धिमा कपूर तिच्या पतीसोबत मुंबईतील माहेरी पोहोचली आहे. रिद्धिमा पती आणि मुलीसोबत मुंबई विमानतळावर स्पॉट झाली आहे. रिद्धिमाला तिचा भाऊ रणबीरच्या लग्नाच्या तारखेबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने स्पष्ट उत्तर दिले नाही.
आलिया-रणबीरचे लग्न कधी होणार? -आलिया-रणबीरच्या लग्नाच्या तारखेबाबत संभ्रम आहे. आलिया भट्टचे काका रॉबिन भट्ट यांनी सांगितले होते की हे जोडपे 15 तारखेला लग्न करणार आहेत, तर आलिया भट्टचा भाऊ राहुल भट्ट म्हणाला की आलिया-रणबीरचे लग्न या आठवड्यात होणार नाही. अशा परिस्थितीत आलिया आणि रणबीरचे चाहते लवकरात लवकर लग्नाची तारीख जाहीर होण्याची वाट पाहत आहेत.
आलिया भट्टचा लेहेंगा तयार -नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये आलिया-रणबीरच्या लग्नातील पोशाख एका कारमध्ये दिसत होता. कॉस्च्युमच्या पॅकिंगवर बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची यांचे नाव लिहिले होते. आलिया सब्यसाचीने डिझाइन केलेला लेहेंगा घालणार आहे. आलियाचे कॉस्च्युम डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी लग्नाच्या इतर उत्सवांसाठी ड्रेस डिझाइन केले आहेत.
हेही वाचा -रामोजी फिल्म सिटीमध्ये 'प्रोजेक्ट के'च्या शूटिंगसाठी दीपिका पदुकोण हैदराबादमध्ये दाखल