हैदराबाद :रणबीर कपूर ( Actor Ranbir Kapoor ) सध्या आपली गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टसोबतच्या ( Actress Alia Bhatt ) लग्नामुळे खूप चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे जोडपे 15 एप्रिलला सात फेरे घेतील. याआधी रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल मोठी बातमी आली आहे. सध्या रणबीर दिग्दर्शक लव रंजन यांच्या रोमँटिक कॉमेडी चित्रपटासाठी चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर ( Actress Shraddha Kapoor ) पहिल्यांदाच दिसणार आहे. आता या चित्रपटातील रणबीर कपूरच्या व्यक्तिरेखेवरून पडदा उचलण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक लव रंजनच्या या चित्रपटात रणबीर कपूर थेरपिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेत रणबीर कपूर नात्यातील समस्या सोडवताना दिसणार आहे. 'प्यार का पंचनामा' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' चित्रपटांचे दिग्दर्शक लव रंजन ( Director Luv Ranjan ) यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली, ज्या चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या घोषणे सोबतच हा चित्रपट 8 मार्च 2023 रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.