मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने पत्नी आलिया भटबद्दल बोलत असलेला व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल आणि हिट झाल्यानंतर ट्रोलर्सना आमंत्रित केले आहे. रणबीर आलियाशी ज्या प्रकारे वागत आहे त्याबद्दल सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आलियाने दावा केला आहे की रणबीर तिला तिची लिपस्टिक काढण्यास सांगतो कारण त्याला ओठांचा नैसर्गिक रंग अधिक पसंत असतो.
या प्रकारामुळे सोशल मीडियामध्ये रणबीरवर कठोर टीका झाली आहे आणि नेटिझन्सने त्याची तुलना शाहिद कपूरच्या कुप्रसिद्ध पात्र कबीर सिंगशी केली आहे. रणबीर कपूरचे हे वागणे अनेकांना आवडलेले नाही आणि त्यामुळे ते टीका करत आहेत. एका युजरने म्हटलंय की, बॉलिवूडची तिच्या काळातील श्रेष्ठ आणि आघाडीची अभिनेत्री आपली महागडी लिपस्टिक तिच्या नवऱ्याच्या सांगण्यावरुन पुसून टाकते. मग तिच्या आवडीचे काय? असा प्रश्न तयार होत नाही का ?.'
आणखी एकाने म्हटलंय की, 'नवऱ्याच्या चुकीच्या बोलण्याचेही ते समर्थन करत आहे, असे तिला वाटत नाही का? तिला जर ते योग्य आहे असे वाटत असेल तर यातून चुकीचा संदेश जातो. '
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे सध्याचे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहणारे जोडपे आहे. ब्रम्हास्त्रच्या सेटवर सुरू झालेला त्यांचा रोमान्स बोहल्यापर्यंत पोहोचला होता. १४ एप्रिल २०२२ रोजी दोघांनी एकमेकांना पुष्पाहार घालून स्वीकारले. या प्रसंगी दोन्ही कुटुंबातील नातेवाईक हजर होते. त्यांच्या सुखी संसारात आता एका मुलीचा समावेश झाला आहे.