मुंबई - यशराज फिल्म्सने रणबीर कपूरचा मुख्य भूमिका असलेल्या 'शमशेरा' चित्रपटाचे पहिले अधिकृत पोस्टर रिलीज केले आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर लीक झाले होते. आता चित्रपटाच्या मूळ पोस्टरसोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. चित्रपटातील रणबीर कपूरचा फर्स्ट लूक पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. रणबीर त्याच्या नव्या लूकमध्ये जबरदस्त भूमिकेत दिसत आहे. चित्रपटाचे नवीन पोस्टर चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची उत्कंठा वाढवू शकते. हा चित्रपट यावर्षी 22 जुलैला रिलीज होणार आहे.
या चित्रपटाचे पोस्टर रणबीर कपूरची पत्नी आलिया भट्ट आणि अभिनेता संजय दत्तनेही शेअर केले आहे. पोस्टरमधील रणबीरच्या लूकवरून स्पष्ट होते की त्याने त्याच्या चित्रपटासाठी बरीच तयारी केली आहे. याशिवाय 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रणबीर कपूरची भूमिकाही पाहायला मिळाली होती.
लॉकडाऊनमुळे लटकला होता चित्रपट - रणबीर कपूरचे चित्रपट चार वर्षांनंतर कमबॅक करत आहेत. या वर्षी त्याचा 'ब्रह्मास्त्र' (9 सप्टेंबर 2022) हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे, पण त्याआधी रणबीर कपूर या वर्षी 22 जुलैला रिलीज होणाऱ्या 'शमशेरा' चित्रपटात जबरदस्त भूमिकेत दिसणार आहे. आता चाहते रणबीरच्या या दोन चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.