मुंबई - लव रंजन-दिग्दर्शित रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा तू झुठी मैं मक्कार हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवला. २२० कोटींची कमाई सिनमाने केली. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. याच्या ओटीटी प्रमोशन दरम्यान रणबीर कपूरने त्याचा मित्र बॉलीवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरच्या नातेसंबंधाबद्दल एक सनसनाटी खुलासा केला आहे.
ऐश्वर्या मोहनराजच्या ऑकवर्ड इंटरव्यूव्हमध्ये रणबीर कपूर - रणबीरने सोशल मीडिया सेलिब्रेटी ऐश्वर्या मोहनराजच्या ऑकवर्ड मुलाखतीत सहभाग घेतला होता. रणबीरने त्याच्या मेटफ्लिक्सवरील मुलाखतीदरम्यान ऐश्वर्याशी गप्पा मारल्या, ज्यामध्ये आदित्य हा चर्चेचा विषय होता. तिच्याशी बोलत असताना, रणबीरने तिच्या बेस्ट बॉयफ्रेंड आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांच्या रोमान्सबद्दल सुतोवाच केले. तिचे नाव अ या अक्षराबासून सुरू होत असल्याचे सांगितले. तेव्हा ऐश्वर्याने सांगितले की तिचे आदित्य रॉय चोप्रासोबत पूर्वीच लग्न झालंय. आपले लग्न ४५ मिनीटे टिकल्याचेही ती म्हणाली. यावर तातडीने रणबीरने आदित्यला फोन केला आणि याबद्दल चौकशी केली असता त्याने कबुली दिली व ऐश्वर्या मोहनराजशी गप्पाही मारल्या.
रणबीरच्या न्यू इयर पार्टीत येण्याची ऐश्वर्याची इच्छा- त्यांच्या संभाषणानंतर, ऐश्वर्याने रणबीरला विचारले की तो तिला त्याच्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पार्टीसाठी बोलावेल का, कारण आदित्यने वर्षभरापूर्वी आयोजित केलेल्या सेलिब्रेशनला तो उपस्थित राहिला होता. रणबीर म्हणाला, 'तो नेहमी न्यू इयर पार्टीत असतो. त्याला तुझ्या आजूबाजूला राहायचे असेल तर मला खात्री नाही. तो फक्त तुझ्याशी सौजन्याने वागण्याचा प्रयत्न करत होता. त्याला एक मुलगी आवडते जिचे नाव A ने सुरू होते, हे मला माहीत आहे.