महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

रणबीर कपूर आणि रोहित शेट्टी एकत्र, व्हायरल फोटोनंतर चर्चेला उधाण

Ranbir in police uniform : 'अ‍ॅनिमल'नंतर रणबीर कपूरने आता अ‍ॅक्शनर दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत काम केले आहे. त्याचा पोलिसांच्या गणवेशातील शेट्टीसोबतचा एक फोटो व्हायरल झाला आहे. याविषयी अधिक जाणून घ्या.

Ranbir in police uniform
रणबीर कपूर आणि रोहित शेट्टी

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2024, 4:51 PM IST

हैदराबाद - Ranbir in police uniform : रणबीर कपूरच्या आगामी भूमिकेकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 'अ‍ॅनिमल' चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं चाहत्यांनी प्रचंड स्वागत केल्यानंतर तो पुन्हा या चित्रपटाच्या 'अ‍ॅनिमल पार्क' या सीक्वेलमध्ये झळकणार आहे. या बातमीमुळे फॅन्स सुखावले असतानाच एका नव्या बातमीने खळबळ उडवून दिली आहे. रणबीरने बुधवारी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यात तो पोलीस वर्दीतील फोटोमध्ये 'सिंघम' फेम दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत खुर्चीवर बसलेला दिसत आहे.

चित्रपट निर्माता रोहित शेट्टी 'सिंघम', 'सिम्बा' आणि 'सूर्यवंशी' या कॉप ड्रामाचे दिग्दर्शन केल्यानंतर अक्षय कुमारसोबत तगडी स्टार कास्ट असलेला 'सिंघम अगेन' हा चित्रपट घेऊन येणार आहे. या पार्श्वभूमीवर रोहितसोबत पोलीस वर्दीमध्ये रणबीर कपूर दिसल्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. हे दोघे दिग्गज एकत्र आल्यास मनोरंजनाचा धमाका होऊ शकेल याची खात्री दोघांच्याही चाहत्यांसह प्रेक्षकांना आहे.

रोहित शेट्टीच्या सेटवर रणबीर

मिळालेल्या माहितीनुसार दोघांनी एका जाहिरातीत एकत्र काम केल्याचे सांगितलं जाते मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. दरम्यान, रणबीर कपूर त्याच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. हा चित्रपट 2023 च्या सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक बनला. 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अनेकांना वेड लावले. यानंतर लगेचच या चित्रपटाच्या सीक्वेलचीही घोषणा झाली आहे. यामध्ये रणबीर दुहेरी भूमिका साकारू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

पोलीस वर्दीमध्ये रणबीर

दुसरीकडे, रोहित शेट्टी 'इंडियन पोलीस फोर्स' या ऑनलाइन मालिकेतून डिजिटल पदार्पण करणार आहे. त्याची ही वेब सिरीज 19 जानेवारी रोजी प्राइम व्हिडिओवर उपलब्ध होईल. या मालिकेसाठी त्यानं सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय यांची निवड केली आहे. ही मालिका, जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी कर्तव्य बजावताना सर्वस्व पणाला लावणाऱ्या देशभरातील भारतीय पोलिस अधिकाऱ्यांच्या निःस्वार्थ समर्पण, वचनबद्धता आणि अफाट देशभक्तीला श्रद्धांजली आहे. या मालिकेबद्दल बोलताना रोहितने आपल्या पोलीस फोर्सबद्दलचा अभिमान व्यक्त केला होता.

रोहित शेट्टी पिक्चर्समधील मी आणि माझ्या टीमने वर्षानुवर्षे कठोर परिश्रम आणि वचनबद्धतेने तयार केलेल्या कॉप- युनिव्हर्समधील निर्माता म्हणून भारतीय पोलीस दल हा माझ्या प्रवासाचा एक अविभाज्य भाग आहे. भारतीय पोलीस अधिकार्‍यांच्या शौर्याला, बलिदानाला आणि शौर्याला आदरांजली वाहणारी कृती मालिका आणण्यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या कलाकारांचा आणि संघाचा अभिमान आहे, असे रोहित शेट्टी म्हणाला होता.

हेही वाचा -

  1. जान्हवी कपूरनं श्रीदेवीच्या आकस्मिक मृत्यू आणि कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियाबद्दल केला खुलासा
  2. प्रीटी झिंटानं पती जीन गुडनॉफसोबत केला फोटो शेअर
  3. आमिर खानची लाडकी मुलगी आयरा खानचा विवाह मोठ्या थाटामाटात पडला पार

ABOUT THE AUTHOR

...view details