मुंबई - संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अॅनिमल' चित्रपटाच्या रिलीजच्या तयारीत अभिनेता रणबीर कपूर आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अद्याप रिलीज व्हायचाय. यापूर्वी रिलीज झालेल्या चित्रपटाच्या टीझर आणि गाण्यामधून यातील त्यच्या भूमिकेत संदीप रेड्डी वंगा यांच्या गाजलेल्या 'अर्जुन रेड्डी' आणि 'कबीर सिंग'ची झलक पाहायला मिळतेय. 'अर्जुन रेड्डी' हा मूळ चित्रपट तेलुगू भाषेत बनला होता आणि नंतर 'कबीर सिंग' या नावानं त्याचा हिंदीत रिमेक करण्यात आला होता.
त्याच्या भूमिकेबदद्ल बोलताना रणबीर कपूर म्हटलंय की, संदीप रेड्डी याच्या पूर्वीच्या नायकांमधील समानता आणि फरक दोन्ही यातील व्यक्तीरेखांमध्ये आहेत. केवळ वंगा याच्या पूर्वीच्या कामाचा प्रभाव न ठेवता स्क्रिप्टचं आकर्षण म्हणून भूमिका स्वीकारली असल्याचं रणबीर म्हणाला.
अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना आणि बॉबी देओल यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'अॅनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. एका आंतरराष्ट्रीय मासिकाला दिलेल्या मुलाखतीत, रणबीरनं वंगाच्या मागील चित्रपटांमधील खलवृत्तीच्या चित्रणाबद्दल चिंता व्यक्त केली आणि वंगा यांच्या प्रभावाबद्दल कौतुकही व्यक्त केलं. परंतु 'अॅनिमल'मध्ये सामील होण्याचा त्याचा निर्णय चित्रपटाची स्क्रिप्ट आणि संदीप वंगासोबत काम करण्याची संधी घेतली असल्याचं तो म्हणाला.
रणबीरला विश्वास आहे की 'अॅनिमल' सिनेमाचा एक वेगळा अनुभव देईल. वंगाच्या आधीच्या नायकांशी त्याच्या पात्राचे साम्य असल्याचे मान्य करून, त्यानं त्याच्या भूमिकेत दडलेले गुंतागुंतीचे स्तर आणि खोली लक्षात घेतली, असुरक्षितता आणि अंतर्गत संघर्षाचे क्षण त्यात जोडले, ज्यामुळे पात्र अधिक अस्सल आणि मानवी झाले.