महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

बॉबी देओलसोबत 'बदतमीज दिल' गाण्यावर थिरकल्यानंतर रणबीर कपूरनं केली 'ही' विनंती - बॉबी देओल

Ranbir Kapoor Dance : रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये रणबीर आणि बॉबीनं जबरदस्त डान्स केला.

Ranbir Kapoor Dance
रणबीर कपूरचा डान्स

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2023, 12:25 PM IST

मुंबई - Ranbir Kapoor Dance : रणबीर कपूर त्याच्या अ‍ॅक्शन आणि थ्रिलर चित्रपट 'अ‍ॅनिमल'च्या रिलीजबद्दल खूप उत्सुक आहे. रणबीर कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि अनिल कपूर स्टारर'अ‍ॅनिमल' या चित्रपटाचा ट्रेलर 23 नोव्हेंबर रोजी दिल्लीतून लॉन्च करण्यात आला. हा ट्रेलर चाहत्यांना खूप पसंत पडला आहे. आता चाहते 'अ‍ॅनिमल' चित्रपट पाहण्यासाठी आतुर आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रणबीर अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यास फारसा वेळ उरलेला नाही. दरम्यान रणबीर कपूर आणि चित्रपटातील संपूर्ण स्टार कास्ट 'अ‍ॅनिमल'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

रणबीर कपूर आणि बॉबी देओलचा डान्स :या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रणबीर कपूर आणि बॉबी देओलनं प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केलं आहे. एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये रणबीर कपूरनं बॉबी देओलच्या 'तेरी अदाओं पे मरता हूं' या हिट गाण्यावर डान्स केला. यानंतर रणबीरला त्याच्या 'ये जवानी है दिवानी' या हिट चित्रपटातील 'बदतमीज दिल' या सुपरहिट गाण्यावर डान्स करण्याची अनेकांनी विनंती केली. त्यानंतर रणबीर आणि बॉबी देओलनं या गाण्यावर डान्स केला. हा डान्स केल्यानंतर रणबीर कपूर म्हटलं, 'हे गाणे 2013 मध्ये रिलीज झाले होते आणि मी जिथे जातो तिथे हे गाणे मला फॉलो करते, हे गाणं खूप वाजवलं जातं. आता मी 41 वर्षाचा आहे, मी या गाण्यावर डान्स केला तर माझी पाठ दुखते, त्यामुळं मी सर्व इव्हेंट मॅनेजरला विनंती करतो की, पुन्हा पुन्हा हे गाणं दुसऱ्या इव्हेंटमध्ये वाजवू नका'. त्यानंतर इव्हेंटमधील सर्व प्रेक्षक जोरात हसले.

'अ‍ॅनिमल' चित्रपटबद्दल : 'अ‍ॅनिमल' चित्रपट 1 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट याआधी 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र सनी देओलचा 'गदर 2'मुळं या चित्रपटाची तारीख पुढं ढकल्यात आली होती. कबीर सिंग आणि अर्जुन रेड्डी दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी 'अ‍ॅनिमल'चं दिग्दर्शन केले आहे. रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये सुरेश ओबेरॉय, शक्ती कपूर, प्रेम चोप्रा, परिणीती चोप्रा आणि तृप्ती डिमरी या कलाकाराच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

हेही वाचा :

  1. 'टायगर 3'च्या यशानंतर सलमान खानच्या आगामी चित्रपटाचं शीर्षक जाहीर
  2. 'बाळाचा बाप कोण?' हे सांगणारा फोटो शेअर करुन इलियाना डिक्रूझनं केलं चकित
  3. अमिताभ बच्चन यांनी मुलगी श्वेता बच्चन नंदाला मुंबईतील 'प्रतीक्षा' बंगला दिला भेट

ABOUT THE AUTHOR

...view details