मुंबई :रणबीर कपूरच्या अॅनिमलच्या निर्मात्यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला बहुप्रतिक्षित क्राईम ड्रामामधून बॉलिवूड स्टारचा फर्स्ट लुक (Animal first look) रिलीज केला. हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) यांनी दिग्दर्शित केला आहे. त्यांनी 2019 च्या ब्लॉकबस्टर कबीर सिंगसह बॉलीवूडमध्ये दिग्दर्शनात पदार्पण केले होते. तो त्याच्या 2017 च्या तेलगू हिट अर्जुन रेड्डीचा रिमेक आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर टी-सिराजच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये रणबीर कपूर अगदी वेगळ्या अंदाजात दिसत आहे.
रणबीर कपूरचा पहिला लुक :भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या टी-सिरीज, मुराद खेतानी यांचा सिने१ स्टुडिओ आणि प्रणय रेड्डी वंगा यांच्या भद्रकाली पिक्चर्सने अॅनिमलची निर्मिती केली आहे. निर्मात्यांनी मध्यरात्री त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर रणबीर कपूरचा पहिला लुक (Ranbir Kapoor looks savage in first look) अनावरण केला. हा अभिनेता खडबडीत अवतारात, कुऱ्हाड धरून सिगारेट पेटवताना दिसत आहे.
पहिली झलक प्रेक्षकांसमोर : निर्मात्यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणताना आम्हाला आनंद होत आहे. पोस्टरमधील रणबीरचा लूक चित्रपटाच्या भावार्थाला चांगला न्याय देतो आणि आम्हाला विश्वास आहे की, प्रेक्षक त्यांच्या पात्रतेच्या चित्रपटाचे साक्षीदार होतील, असे निर्मात्यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे. पोस्टर टी-सिराजच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. पोस्टरमध्ये अभिनेता रणबीर कपूरचा साइड चेहरा दिसत आहे. तो रक्ताने माखलेला दिसत आहे. त्याचे हात रक्ताने माखले आहेत. दाढीच्या लूकमध्ये तो खूपच गंभीर दिसत आहे. पोस्टर रिलीज करताना, टी-सीरीजच्या वतीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, '2023 मध्ये तयार रहा'.